Join us

RSA vs SL : श्रीलंकेच्या नव्या जयसूर्याची हवा; टेस्टमध्ये विकेट्सच्या 'सेंच्युरी'सह बेस्ट रेकॉर्ड केला नावे

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात प्रभात जयसूर्या नावाच्या श्रीलंकेच्या ताफ्यातील फिरकीपटूनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:49 IST

Open in App

Prabath Jayasuriya Competed 100 Test Wickets In Just 17 Match : क्रिकेट जगतात 'जयसूर्या' हे नाव चांगलेच गाजलं आहे. श्रीलंका म्हटलं की सनथ जयसूर्या आठवला नाही असं होतं नाही. कारण तुफान फटकेबाजीनं त्यानं आपला काळ गाजवलाय. आता लंकेला मॉडर्न जमान्यातील नवा जयसूर्या मिळालाय. होय... पण हा जयसूर्या बॅटिंगमध्ये नाही तर गोलंदाजीत हवा करताना दिसतोय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात प्रभात जयसूर्या नावाच्या श्रीलंकेच्या ताफ्यातील फिरकीपटूनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे. सर्वात कमी कसोटी सामन्यात १०० विकेट्स आपल्या खात्यात जमा करण्याचा टेस्टमधील बेस्ट रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केलाय. श्रीलंकेकडून अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय. 

परेराचा विक्रम मोडत साधला मोठा डाव

   प्रभात जयसूर्यानं १७ कसोटी सामन्यात १०० विकेट्स घेण्याचा पल्ला गाठला आहे. या कामगिरीसह त्याने दिलरुवान परेराला मागे टाकले. परेरानं २५ कसोटी सामन्यात कसोटीत १०० विकेट्स पटकावल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात १७ सामन्यात प्रभात जयसूर्यानं मोठा डाव साधला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करण्यात संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर  

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद शंभर विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रभात जयसूर्या हा संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत इंग्लंडचे माजी दिग्गज क्रिकेटर जॉर्ज लोहमन अव्वलस्थानी आहेत. त्याने १६ कसोटी सामन्यात शंभर विकेट्स मिळवण्याचा पराक्रम नोंदवला होता. हा विक्रम आजही अबाधित आहे. जॉर्ज लोहमन यांच्यानंतर कसोटीत सर्वात जलद १०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चार जण संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. ज्यांनी १७ कसोटी सामन्यात शंभर विकेट्सचा पल्ला गाठला आहे. 

कमी कसोटी सामन्यात १०० विकेट्स घेणारे गोलंदाज 

  • जॉर्ज लोहमन - १६ कसोटी - इंग्लंड
  • क्लेरी टर्नर -  १७ कसोटी - ऑस्ट्रेलिया 
  • सिडनी बार्नेस - १७ कसोटी - ऑस्ट्रेलिया 
  • क्लेरी ग्रिमेट - १७ कसोटी - ऑस्ट्रेलिया 
  • यासिर शाह - १७ कसोटी - पाकिस्तान 
  • प्रभात जयसूर्या - १७ कसोटी - श्रीलंका 
  • भारताकडून आर अश्विनच्या नावे आहे रेकॉर्ड 

भारताकडून कसोटीत सर्वात जलद १०० विकेट्स घेण्याचा विक्रम हा आर अश्विनच्या नावे आहे. त्याने १८ कसोटी सामन्यात हा डाव साधला आहे. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाद. आफ्रिकाश्रीलंका