South Africa U19 vs India U19, 2nd Youth ODI Vaibhav Suryavanshi Fifty : भारत अंडर-१९ आणि दक्षिण आफ्रिका अंडर-१९ यांच्यातील दुसऱ्या वनडेत वैभव सूर्यवंशीने अवघ्या १९ चेंडूंमध्ये झंझावाती अर्धशतक झळकावले. यूथ वनडेतील सर्वात कमी वयातील कर्णधार होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवल्यावर दुसऱ्या सामन्यात त्याच्या भात्यातून नेतृत्व करताना पहिले अर्धशतक आल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, अखेरच्या ६ चेंडूत कुटल्या २३ धावा
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या २४६ धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने आक्रमक अंदाजातील फटकेबाजीसह युवा टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात करून दिली. अर्धशतकी खेळीच शतकात रुपांतर करेल, असे वाटत असतााना २४ चेंडूत ६८ धावांवर त्याने आपली विकेट गमावली. या खेळीत त्याने १ चौकार आणि १० षटकार मारले. त्याने २८३.३३ च्या स्ट्राईक रेटसह धावा करत सामना टीम इंडियाच्या बाजूनं सेट केला. कर्णधार वैभव सूर्यवंशी याने एरॉन जॉर्जच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची दमदार भागीदारी रचली. यात वैभव सूर्यवंशीने फक्त १८ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या ६ चेंडूत वैभव सूर्यवंशी याने २३ धावा आपल्या खात्यात जमा केल्या.
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
वैभव सूर्यवंशीच्या नावे झाला आणखी एक विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने ३०१ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाने हा सामना २५ धावांनी जिंकला. पण पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा हिट शो पाहायला मिळाला नव्हता. १२ चेंडूचा सामना करून २ चौकाराच्या मदतीने फक्त ११ धावांची भर घालून वैभव सूर्यवंशी बाद झाला होता. पण या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपल्या भात्यातील धमक दाखवून देत नेतृत्वातही फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून दिले. यूथ वनडेत सर्वात कमी वयात कर्णधारपद भूषवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नावे केल्यावर आता कमी वयात नेतृत्व करताना अर्धशतक झळकवण्याचा नवा विश्वविक्रम त्याच्या नावे झाला आहे.