Join us

South Africa tour of India 2022 : BCCI भारतीय खेळाडूंना दमवणार, IPL 2022 संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार, बघा वेळापत्रक 

South Africa tour of India 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची सांगता २९ मे रोजी होणार आहे आणि त्यानंतर लगेच १० दिवसांत भारतीय खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 21:32 IST

Open in App

South Africa tour of India 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची सांगता २९ मे रोजी होणार आहे आणि त्यानंतर लगेच १० दिवसांत भारतीय खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळावी लागणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन पाच ट्वेंटी-२० सामन्यांची ही मालिका भारतात खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने शनिवारी India vs South Africa T20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी घोडदौड राखण्यासाठी सज्ज आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे. आयपीएल २०२२मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दिनेश कार्तिकचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. शिवाय विराट कोहली विश्रांती घेऊ शकतो. पाच सामन्यांची ही मालिका ९ जून पासून सुरू होणार आणि पाचवा सामना १९ जूनला होईल. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआय दुसऱ्या फळीतील संघ पाठवण्याची शक्यता अधिक आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्ली
  • दुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटक
  • तिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाक
  • चौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोट
  • पाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय
Open in App