South Africa Debutant Corbin Bosch Scripts History Against Pakistan : सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात बॉलरनं पदार्पणाच्या सामन्यात बॅटिंगमचा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. पाकिस्तानचा संघ या सामन्यातील पहिल्या डावात २११ धावांत ऑल आउट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) याने पॉश खेळी करत चार विकेट्स घेतल्या. एवढ्यावर तो थांबला नाही तर बॅटिंगमध्ये त्याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.
आधी बॉलिंग वेळी मारला 'चौकार'; मग फलंदाजीत दाखवली जादू
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) नं घेतलेल्या चार विकेट्सशिवाय ३५ वर्षीय डेन पीटरसन याने पंजा मारला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्या डावात ३०१ धावा करत सामन्यात ९० धावांची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. संघाच्या या कामगिरीत सलामीवीर एडन मार्करम याच्यासह कॉर्बिन बॉश याने कडक बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले.
अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू
दक्षिण आफ्रिकेकडून मार्करम याने सर्वाधिक ८९ धावा केल्या. त्याच्याशिवाय पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या आणि प्रमुख गोलंदाज असलेल्या कॉर्बिन बॉशनं ८१ धावांची खेळी केली. ९३ चेंडूतील आपल्या खेळीत त्याने १५ चौकार मारले. पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेटसह अर्धशतक झळकावणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला.
एका वर्षात दुसऱ्यांदा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड
कॉर्बिन बॉश नवव्या क्रमांकाव फलंदाजीला आला होता. तो मैदानात उतरला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर ७ बाद १९१ धावा होत्या. त्याने मार्करम, रबाडा आणि पीटरसनसोबत छोटी छोटी भागीदारी करत त्याने अर्धशतकी खेळी केली. एवढेच नाही तर ८१ धावांवर तो नाबाद राहिला. या खेळीसह पदार्पणाच्या कसोटी सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च खेळी करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता त्याच्या नावे झाला आहे. याच वर्षी श्रीलंकेच्या मिलन रत्नायके याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय बलविंदर सिंग संधू या दिग्गजाचा विक्रम मोडीत काढला होता. आता त्याचा विक्रम मोडीत काढून दक्षिण आफ्रिकेचा बॉलर बॅटिंगमध्ये हिरो ठरला आहे.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात नवव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- ८१* - कॉर्बिन बॉश विरुद्ध पाकिस्तान , २०२४
- ७२ - मिलन रत्नायके विरुद्ध इंग्लंड, २०२४
- ७१ - बलविंदर सिंह संधू विरुद्ध पाकिस्तान, १९८३
- ५९ - मोंडे जोंडेकी विरुद्ध इंग्लंड, २००३
- ५६* - विल्फ फर्ग्युसन विरुद्ध इंग्लंड, १९४८
Web Title: South Africa Debutant Corbin Bosch Scripts History With Breaks 122 Year Old Record During South Africa vs Pakistan 1st Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.