Join us

मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघावर आयसीसीकडून बंदीची शक्यता 

दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 15:24 IST

Open in App

दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघावर बंदी घातली जाण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डात आता तेथील सरकारनं हस्तक्षेप केला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही देशाचं क्रिकेट बोर्ड ही स्वतंत्र संस्था असणं गरजेचं आहे. क्रिकेट बोर्डामध्ये कोणत्याही सरकारचा हस्तक्षेप नसावा असं आयसीसीचा नियम सांगतो. पण दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचा ताबा आता तेथील सरकार घेत असल्यामुळे आयसीसीच्या नियमांचा भंग होत आहे. (South Africa cricket faces risk of ICC ban after government intervention)

दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री नाथी मठ्ठवा यांनी रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असं विधान केलं आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या कायद्यानुसार देशाचं क्रीडा क्षेत्र कठीण प्रसंगाचा सामना करत असेल आणि वाद होत असतील किंवा व्यवस्थापनावर आरोप होत असतील तर क्रीडा मंत्र्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे.  

दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट बोर्ड जर सरकारनं हातात घेतल्यास आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन होईल. त्यामुळे संघावर बंदी घालण्याची कारवाई आयसीसीकडून केली जाऊ शकते.  

टॅग्स :आयसीसीद. आफ्रिका