महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील गुवाहटीच्या बरसापारा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात सेमीफायनलमधील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३१९ धावा करत इंग्लंडसमोर ३२० धावांचे टार्गेट सेट केले. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील नॉकआउटमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉराची विक्रमी खेळी
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये लॉरानं १४३ चेंडूत २० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १६९ धावांची खेळी केली. खेळी केली. तिने ब्रिट्सच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची दमदार भागीदारी रचली. सलामीची बॅटर ६५ चेंडूत ४५ धावा करून परतल्यावर मेरीझान कॅप ४२ (३३) आणि क्लोई ट्रायॉन यांनी ३३ (२६)* केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने धावफलकावर ३१९ धावा लावल्या.
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमधील मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी
ऑस्ट्रेलियानं विक्रमी धावसंख्येसह मारली होती फायनल बाजी
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉकआउटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. २०२२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लंडसमोर ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३५६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २८५ धावांपर्यंतच मजल मारु शकला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नॉकआउटमध्ये इंग्लंडविरुद्ध मोठी धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले.
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड
- ३१९/७ विरुद्ध इंग्लंड (गुवाहाटी, २०२५ उपांत्य सामना*
- ३१२/९ विरुद्ध पाकिस्तान कोलंबो, २०२५
- ३०५/९ विरुद्ध इंग्लंड ब्रिस्टल, २०१७
- २७५/७ विरुद्ध भारत (ख्राइस्टचर्च, २०२२)
वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड
- १६९ - लॉरा वूलव्हार्ड्ट विरुद्ध इंग्लंड (२०२५ उपांत्य सामना)
- १०२ - मेरीझान कॅप विरुद्ध पाकिस्तान (२०१३)*
- १०१ - लिंडा ऑलिव्हियर विरुद्ध आयर्लंड (२०००)*
- १०१ - तझमिन ब्रिट्स विरुद्ध न्यूझीलंड (२०२५)