Join us  

सौरभ गांगुलीचा फोन त्याच्याच घरातून चोरीला; खासगी माहिती लीक होण्याची क्रिकेटच्या दादाला भीती

सौरभ गांगुली कोलकाताच्या बाहेर गेला होता. शनिवारी तो घरी परतला. तेव्हा त्याने त्याचा फोन घरात एका जागी ठेवला होता. तेव्हापासून त्याचा फोन सापडत नाहीय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 11:39 PM

Open in App

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपट्टू आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा मोबाईल फोन त्याच्याच घरातून चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या फोनमध्ये बऱ्याच खासगी गोष्टी असून सौरवने ठाकुरपुकुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. 

कोलकातामधील बेहला येथील सौरभच्या घरी हा प्रकार घडला आहे. गांगुलीने पोलिसांना पत्र लिहून या फोनमध्ये खासगी माहिती असल्याचे म्हटले आहे. तसेच त्या लीक होण्याची शक्यता असून हा प्रकार रोखण्यासाछी त्वरित कारवाई करावी असे म्हटले आहे. 

सौरभ गांगुली कोलकाताच्या बाहेर गेला होता. शनिवारी तो घरी परतला. तेव्हा त्याने त्याचा फोन घरात एका जागी ठेवला होता. तेव्हापासून त्याचा फोन सापडत नाहीय. 

सौरभच्या घरात रंगरंगोटीचे काम सुरु आहे. यामुळे अनेक लोकांची येजा असते. याच धावपळीत आपला फोन चोरीला गेला असल्याचे सौरभने म्हटले आहे. या फोनमध्ये बँकेची माहिती, अन्य खासगी माहिती आणि मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असल्याचे सौरवने कळविले आहे. 

टॅग्स :सौरभ गांगुलीचोरी