Join us
Daily Top 2Weekly Top 5

सौरव गांगुली आता रवी शास्त्रींना लावणार कामाला; देणार 'ही' अतिरीक्त जबाबदारी

कारण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शास्त्री यांनी अतिरीक्त जबाबदारी देण्याचे सुतोवाच केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 14:22 IST

Open in App

मुंबई : आतापर्यंत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे फक्त संघाबरोबरच असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता त्यांना चागलंच कामाला लावलं जाणार आहे. कारण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शास्त्री यांनी अतिरीक्त जबाबदारी देण्याचे सुतोवाच केले आहे.

आतापर्यंत फक्त भारतीय संघाबरोबर शास्त्री होते. भारतीय संघाचा सराव शास्त्री करून घेताता. त्याचबरोबर संघ व्यवस्थापनामध्येही त्यांचा सहभाग असतो. संघाची निवड, रणनीती आखणेस हे कामही शास्त्री करतात. पण आता त्यांना या व्यतिरीक्त नवीन काम करावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये जसे हाय परफॉर्मन्स सेंटर आहे, तसेच गांगुलीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला बनवायचे आहे. त्यासाठी एक जागाही त्यांनी पाहिली आहे. अकादमीचे संचालकपद सध्या भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडकडे आहे. पण रवी शास्त्री यांनीही या अकादमीमध्ये यावे आणि मार्गदर्शन करावे, असे गांगुलीला वाटत आहे.

याबाबत गांगुली म्हणाला की, " राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद द्रविडकडे आहे. या अकादमीमध्ये पारस म्हाम्ब्रेदेखील आहे. त्याचबरोबर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुणही येथे येतात. पण शास्त्री येत नाहीत. पण आता त्यांना येथे येऊन मार्गदर्शन करावे लागेल."

टॅग्स :रवी शास्त्रीसौरभ गांगुली