Join us

भारतीय संघ कोण निवडतो, तुम्ही की रोहित शर्मा? सौरव गांगुलीचा रवी शास्त्रींना सवाल

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुन्हा एकदा भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 13:37 IST

Open in App

पुणे : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुन्हा एकदा भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. हल्लीचे क्रिकेट प्रशिक्षक स्वतःला फुटबॉल प्रशिक्षक असल्यासारखे वाटतात. त्यांना असं वाटते की संघाच्या विजयात त्यांची खूप महत्त्वाची भूमिका असते, परंतु वस्तुस्थिती निराळी आहे. क्रिकेट हा कर्णधारांचा खेळ आहे आणि प्रशिक्षकांनी खुर्चीवर बसून सामन्याचा आस्वाद घ्यावा, असे मत गांगुलीने व्यक्त केले. 

तो म्हणाला,''क्रिकेट आणि फुटबॉल यात बराच फरक आहे. फुटबॉल प्रशिक्षकांप्रमाणे आपण क्रिकेट संघ चालवत असल्याचा गैरसमज सध्याच्या प्रशिक्षकांमध्ये वाढलेला आहे. क्रिकेट हा कर्णधाराचा खेळ आहे आणि प्रशिक्षकांची भूमिका पडद्यामागची आहे. याची जाण त्यांना करून देणे महत्त्वाचे आहे.'' 

प्रशिक्षकपदासाठी 'व्यक्ती व्यवस्थापन' कौशल्य महत्त्वाचे आहे आणि फार कमी लोकांमध्ये ते दिसते, असेही गांगुली म्हणाला. याचबरोबर त्याने रवी शास्त्री यांना एक प्रश्न विचारला. तो म्हणाला,''अंतिम संघ कोण निवडतो, रोहित शर्मा की रवी शास्त्री?''  

टॅग्स :आशिया चषकसौरभ गांगुलीरवी शास्त्री