Join us  

Sourav Ganguly : सौरव गांगुलीला संघावर 'दादागिरी' करायची होती; ग्रेग चॅपेल यांचा खळबळजनक दावा

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या कार्यकाळात अनेक वाद झाले. टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार चॅपेल यांच्याशी कधी पटलेच नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 2:59 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या कार्यकाळात अनेक वाद झाले२००५ ते २००७ या कालावधीत त्यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषविले

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या कार्यकाळात अनेक वाद झाले. टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार चॅपेल यांच्याशी कधी पटलेच नाही. २००५ ते २००७ या कालावधीत त्यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषविले. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांनीही चॅपेल यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला होता. आता चॅपेल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यानं यावेळेस थेट माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्यावर हल्लाबोल केला.

चॅपेल यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाल्याबद्दल गांगुलीचे आभार मानले, परंतु संघातील विरोधामुळे त्यांनी हे प्रशिक्षकपद सोडले. ''या पदासाठी गांगुलीनं मला विचारणा केली. माझ्या डोक्यात त्यावेळी वेगळा विचार सुरू होता, परंतु जॉन बुचाननं यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर मी सर्वाधिक लोकसंख्या व प्रसिद्ध असलेल्या देशाच्या संघाला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. ही संधी मला गांगुलीमुळे मिळाली. गांगुली त्यावेळी संघाचा कर्णधार होता,'' असे चॅपेल म्हणाले.

ते पुढे म्हणाले,''ती दोन वर्ष प्रत्येक आघाडीवर खूपच आव्हानात्मक होती. माझ्याकडून त्यांनी केलेल्या अपेक्षा हास्यास्पद होत्या. गांगुलीच्या कर्णधारपदावरून काही समस्या होत्या. त्याला खेळ सुधारण्यासाठी मेहनत घ्यायची नव्हती. त्याला फक्त कर्णधारम्हणून सर्व गोष्टी मुठीत ठेवायच्या होत्या.'' भारतीय संघात अनेक वर्षांपासून आलेल्या काही गोष्टी बदलायच्या होत्या, असेही चॅपेल यांनी मान्य केले. 

ते म्हणाले, ''राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली हा संघ जगातील सर्वोत्तम ठरला असता. पण, संघातील प्रत्येकाला तसे वाटत नव्हते. संघापेक्षा त्यांना संघातील स्थान कायम राखण्यावर अधिक महत्त्वाचे वाटत होते. काही वरिष्ठ खेळाडूंसोबत मतभेद होते, कारण ते त्यांच्या कारकीर्दिच्या शेवटावर होते. जेव्हा गांगुलीला संघातून वगळण्यात आले, तेव्हा प्रत्येक खेळाडूंकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. कारण, गांगुलीला डच्चू मिळू शकतो, तर आपल्यालाही मिळेल, असे त्यांना वाटत होते.'' 

''१२ महिन्यांचा कार्यकाळ अगदी चांगला गेला, परंतु जेव्हा गांगुली संघात परतला तेव्हा विरोध टोकाला गेला. खेळाडूंकडून स्पष्ट संदेश मिळत होते, की आम्हाला ब दल नकोय. त्यामुळेच बोर्डानं मला नवा करार दिला, तेव्हा उगाच मनस्ताप नको, असा मी निर्णय घेतला,''असेही चॅपेल म्हणाले.  पाहा व्हिडीओ...

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ