Sourav Ganguly on Virat Kohli Notice : गांगुलीनं खरंच केली होती कोहलीला नोटीस पाठवायची तयारी? 'दादा'नं मौन सोडलं

बीसीसीआयने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेतले होते. यानंतर 33 वर्षीय विराटने या महिन्यातच कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. कोहलीच्या अचानकपणे कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:25 AM2022-01-22T11:25:01+5:302022-01-22T11:25:07+5:30

whatsapp join usJoin us
Sourav ganguly says me wanting to send show-cause notice to Kohli are not true | Sourav Ganguly on Virat Kohli Notice : गांगुलीनं खरंच केली होती कोहलीला नोटीस पाठवायची तयारी? 'दादा'नं मौन सोडलं

Sourav Ganguly on Virat Kohli Notice : गांगुलीनं खरंच केली होती कोहलीला नोटीस पाठवायची तयारी? 'दादा'नं मौन सोडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमध्ये काहीसे वाद-विवादांचे वातावरण दिसत आहे. विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यातील संबंध फारसे चांगले दिसत नाहीत. यांचे मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

बीसीसीआयने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेतले होते. यानंतर 33 वर्षीय विराटने या महिन्यातच कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. कोहलीच्या अचानकपणे कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

गेल्या आठवड्यातील वृत्तांनुसार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) तेव्हाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli Show Case Notice) डिसेंबर 2021मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी नोटीस पाठवणार होता. माध्यमांत चर्चा होती की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत, स्वतःला वनडे कर्णधार पदावरून हटविल्यासंदर्भात आणि टी-20 कर्णधार पदाच्या संदर्भात जे वक्तव्य केले होते. त्यावरून गांगुलीने त्याला नोटीस पाठविण्याची तयारी केली होती.

गांगुली म्हणाला यात तथ्य नाही -
खरे तर, गांगुलीने आता यासंदर्भात मौन सोडले आहे. गांगुलीने एएनआयशी बोलताना सांगितले की, यात काहीही तथ्य नाही. गेल्या वर्षी कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्याला एकदिवसीय संघात कर्णधारपदी राहायचे असले तरी निवडकर्त्यांनी त्याचे ऐकले नाही आणि त्याला कर्णधारपदावरून दूर केले. भारतीय निवड समितीचे म्हणणे होते की, ते मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दोन कर्णधार ठेऊ शकत नाहीत.

Web Title: Sourav ganguly says me wanting to send show-cause notice to Kohli are not true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.