Join us  

सचिन तेंडुलकर ओपनिंगला नॉन स्ट्राइकवर का रहायचा? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण

सचिन तेंडुलकर वन डे क्रिकेटमध्ये सलामीला स्ट्राइक घेणं का टाळायचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 12:59 PM

Open in App
ठळक मुद्देवन डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीवीर म्हणून सचिन-सौरव ओळखले जातातसचिन तेंडुलकरला स्ट्राइकवर पाठवण्यासाठी गांगुलीनं लढवली शक्कल

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनं रविवारी मयांक अग्रवालसोबत गप्पा मारल्या. यात त्यानं सचिन तेंडुलकर वन डे क्रिकेटमध्ये सलामीला येताना स्ट्राइक घेणं का टाळायचा, यामागचं कारण सांगितलं. सौरव आणि सचिन ही वन डे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम सलामीवीर आहेत. या दोघांनी टीम इंडियाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये या दोघांनी 71 सामन्यांत 61.36च्या सरासरीनं 12 शतकं व 16 अर्धशतकांच्या भागीदारीसह 4173 धावा केल्या आहेत.

या दोघांची फटकेबाजी पाहणे म्हणजे पर्वणीच होती. पण, सलामीला येताना सचिन पहिल्या चेंडूचा सामना करणे नेहमी टाळायचा आणि असं करण्यामागे तो दोन कारण द्यायचा. गांगुलीनं ती दोन कारणं सांगितली. तो म्हणाला,''तो नेहमी मला स्ट्राइक घ्यायला सांगायचा. त्याच्याकडे त्याचं उत्तरही असायचं. मी त्याला स्ट्राइक घ्यायला सांगायचो, पण त्यानं त्यामागची दोन उत्तर मला दिली. तो म्हणायचा, माझा फॉर्म चांगला आहे आणि तो कायम राहण्यासाठी नॉन स्ट्राइकवर राहणेच योग्य आहे आणि जर फॉर्म चांगला नाही, तर पहिला चेंडूचा सामना करताना दडपण येते. त्याच्या या उत्तरांमुळे मलाच पहिल्या चेंडूचा सामना करावा लागायचा.''

''त्याच्याकडे चांगला फॉर्म आणि खराब फॉर्म बद्दल उत्तरं तयार होती. पण, मी 1-2वेळा नॉन स्ट्राइकवर जाऊन उभा राहिलो आणि त्याला नाईलाजानं स्ट्राइकवर जावं लागलं. असं 1-2वेळा घडलं,''असेही गांगुलीनं सांगितले.

पाहा व्हिडीओ...

भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!

पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी

बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'

टॅग्स :सौरभ गांगुलीसचिन तेंडुलकर