Sourav Ganguly New House : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घराचा पत्ता बदलला आहे. गांगुलीने कोलकाता येथे नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. भारताचा माजी कर्णधार गांगुलीने नवीन घरासाठी ४० कोटी रुपये खर्च केले आणि आता तो ४८ वर्षांनंतर वडिलोपार्जित घर सोडणार आहे. ''माझे स्वतःचे घर असल्याचा आनंद आहे. मध्यवर्ती राहणे देखील सोयीचे होईल. पण सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मी ४८ वर्षे राहिलो ते ठिकाण सोडणे,''अशी प्रतिक्रिया गांगुलीने Teleghraph ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
Teleghraphने दिलेल्या माहितीनुसार गांगुलीने लोव्हर रावडन स्ट्रीट येथे 23.6-cottah plot खरेदी केला आहे आणि त्यावर त्याचा आलिशान बंगला उभा राहिला आहे. गांगुलीचे नवीन घर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे त्याला कामानिमित्ताने प्रवास करणे सोपे जाणार आहे. त्याचं जुनं घर हे बेहाला येथे आहे. उद्योगपती अनुपमा बाग्री, केशव दास बिनानी आणि निकुंज दास बिनानी यांच्याकडून गांगुलीने ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
त्याने सह मालक म्हणून आई निरुपा गांगुली, पत्नी डोना गांगुली आणि मुलगी सना गांगुली यांना ठेवले आहे. लवकरच गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदी दिसणार आहे. सध्याचे चेअरमन ग्रेग बार्क्ली यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे आणि गांगुली या पदासाठी उभा राहण्याची शक्यता आहे.
![]()