Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रिकेटच्या 'विकासा'साठी सौरव गांगुलीचं आणखी एक मोठं पाऊल; जाणून घ्या नेमकं काय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच अनेक सकारात्मक निर्णय घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 14:20 IST

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच अनेक सकारात्मक निर्णय घेतले. त्याच्याच पुढाकारानं भारतीय संघ प्रथम डे नाईट कसोटी सामना खेळणार आहे. कोलकाता येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात डे नाइट कसोटी सामना होणार आहे. शिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना मानधनाचा मुद्दाही गांगुलीनं मांडला. आता गांगुलीनं आणखी एक सकारात्मक पाऊल उचललं आहे. त्या दृष्टीनं त्यानं इरफान पठाण आणि परवेझ रसूल या खेळाडूंची भेट घेतली आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आल्यानंतर उत्तर भारतात क्रिकेटच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं गांगुलीनं म्हटलं होतं. त्यादिशेनं पाऊल उचलताना गांगुलीनं जम्मू व काश्मीरमधील क्रिकेटला चालना देण्याचं आश्वासन दिले. जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार रसूल आणि माजी कसोटीपटू इरफान यांच्यासह बीसीसीआयचे काही प्रतिनिधिंनी गांगुलीची भेट घेतली.

''बीसीसीआय अध्यक्षांनी आमचे सर्व मुद्दे जाणून घेतले आणि जम्मू काश्मीरमध्ये क्रिकेटच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा पुरवा, अशी विनंती करण्यात आली आहे,'' असे जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा क्रिकेटचे सामने खेळवण्याचं दादानंही मान्य केल्याचं कळतं. 

''जम्मू काश्मीर संघाला घरच्याच मैदानावर त्यांचे सामने खेळण्याची संधी पुन्हा मिळावी. आमच्याकडे महाविद्यालयीन मैदान आहे आणि त्याची दुरुस्ती केली अन् योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथे प्रथम श्रेणीचे सामने होतील,'' असे सूत्रांनी सांगितले.  जम्मू- काश्मीरचा संघ सध्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा सामना सुरत येथे खेळत आहे.  

सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर तीन वर्ष कायम राहणार? लवकरच होणार मोठा निर्णयभारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या. गांगुलीला केवळ दहा महिन्यांचा कार्यकाळ का, असा प्रश्नही अनेकांना पडला. पण, आता गांगुलीच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची वार्ता येणार आहे. गांगुली आता तीन वर्षांसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहू शकतो. त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या असून बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. 

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 1 डिसेंबरला होणार आहे आणि त्यात 12 मुद्यांसाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत बरेच मुद्दे चर्चिले जाणार आहेत. त्यासाठी आज मुंबईत एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लोकपाल, नवीन क्रिकेट सल्लागार समिती आदी काही मुद्दे आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन टर्म काम पाहिल्यानंतर कुलींग ऑफ वेळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा नियम आहे. पण, आता नव्या प्रस्तावानुसार अध्यक्ष आणि सचिव यांना हा नियम लागू राहू नये, अशी सुचना करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास बीसीसीआय अध्यक्ष गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी राहिल.  

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयजम्मू-काश्मीर