Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सौरव गांगुली होम क्वारंटाईन, कुटुंबातील आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

सौरव गांगुलीनं 8 जुलैला कुटुंबातील सदस्यांसोबत वाढदिवस साजरा केला होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 10:04 IST

Open in App
ठळक मुद्देमागील महिन्यात सौरव गांगुलीच्या वहिनीला कोरोना लागण झाली होती

भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याच्या कुटुंबातील तीन सदस्य काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. गुरुवारी गांगुली कुटुंबातील आणखी एका सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सौरव गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावं लागलं आहे. गांगुलीचा मोठा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिन स्नेहाशीष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महिनाभर आधी स्नेहाशीष यांची पत्नी आणि सासू-सासरे यांना कोरोनाची लागण झाली होती.

स्नेहाशीष यांनी खासजी केंद्रातून कोरोना चाचणी करून घेतली आणि त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. लवकरच ते दुसरी चाचणी करणार आहेत. त्यामुळे आता सौरव गांगुलीसह कुटुंबातील सर्व सदस्य सेफ्ल आयसोलेट झाले आहेत आणि त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. स्नेहाशीष हे सुरुवातीला मोमिनपूर येथे राहत होते, परंतु कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ते गांगुली राहत असलेल्या घरी शिफ्ट झाले. त्यामुळे आता सौरवलाही क्वारंटाईन व्हावं लागलं आहे.

''मागील काही दिवसांपासून स्नेहाशीष यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांना बेल्ले व्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल आला. ते पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सुरक्षिततेची काळजी म्हणून गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे,''असे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं सांगितले.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सौरव गांगुलीनं 8 जुलैला कुटुंबातील सदस्यांसोबत वाढदिवस साजरा केला. आता त्याला 10 दिवस सेल्फ आयसोलेट व्हावे लागणार आहे. स्नेहाशीष हे मागील महिन्यातच कोरोना ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आले होते, परंतु त्यांनी त्यावेळी वृत्ताचा इन्कार केला होता. पश्चिम बंगालमध्ये सध्या 32838 रुग्ण आहेत आणि त्यापैकी 11927 अजूनही अॅक्टीव्ह आहेत.  

टॅग्स :सौरभ गांगुलीकोरोना वायरस बातम्या