मुंबई : भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी एका संकेतस्थळासाठी कसोटी संघ बनवला आहे. पण या संघात कुंबळे यांनी भारताचा माजी महान कर्णधार सौरव गांगुली यांना डच्चू दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
कुंबळे यांनी या संघात राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. मध्यल्या फळीत कुंबळे यांनी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना स्थान दिले आहे. संघामध्ये कपिल देव यांच्या रुपात अष्टपैलू खेळाडू घेण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीची त्यांनी यष्टीरक्षकपदी निवड केली आहे. त्याचबरोबर हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ आणि झहीर खान या गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
अनिळ कुंबळे यांनी निवडलेला कसोटी संघ
· अनिल कुंबळे- कर्णधार
· राहुल द्रविड
· वीरेंद्र सेहवाग
· विराट कोहली
· सचिन तेंडुलकर
· व्हीव्हीएस लक्ष्मण
· कपिल देव
· एम. एस. धोनी
· हरभजन सिंग
· जवागल श्रीनाथ
· झहीर खान