Join us

Sourav Ganguly : लंडनच्या रस्त्यावर मध्यरात्री सौरव गांगुलीचा मुलगी साना व पत्नी डोनासह डान्स, Video Viral

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याने त्याचा ५०वा वाढदिवस दणक्यात साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 16:49 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याने त्याचा ५०वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. लंडनमधील प्रसिद्ध London Eye येथे गांगुलीने त्याच्या कुटुंबीय व जवळच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी गांगुली शाहरुख खानच्या ओम शांती ओम या गाण्यावर थिरकताना दिसला. 

गांगुलीने ११३ कसोटी, ३११ वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ७२१२ व ११३६३ धावा केल्या. त्याच्या नावावर एकूण ३८ शतकं व १०७ अर्धशतकं आहेत.  गांगुली हा भारताचा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे आणि यात काहीच शंका नाही. भारतीय क्रिकेट जेव्हा मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी ढवळून निघालं होतं, तेव्हा गांगुलीने कर्णधारपद स्वीकारलं अन् नेतृत्वक्षमतेनं भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१  असा कसोटी विजय मिळवला, इंग्लंडला २००२मध्ये नेटवेस्ट सीरिजमध्ये पराभूत केले आणि २००३च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. 

London Eye येथे मध्यरात्री गांगुलीचा हा डान्स पाहून सुरूवातीला कन्या सानाला हसू आवरेनासे झाले... पण, नंतर तिही वडिलांसोबत नाचू लागली. यावेळी गांगुलीची पत्नी डोनाही उपस्थित होती. सध्या सोशल मीडियावर हा  व्हिडीओ व्हायरल झाला आहे.    वाढदिवसाच्या आदल्या दिवशी गांगुलीने जुना सहकारी व मित्र सचिन तेंडुलकर,  बीसीसीआय सचिव जय शाह व राजीव शुक्ला यांच्यासोबत सेलिब्रेशन केले.  

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय
Open in App