Breaking : सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 27, 2021 02:49 PM2021-01-27T14:49:59+5:302021-01-27T14:58:03+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly being taken to Apollo Hospital in Kolkata after the BCCI president complained of chest pain | Breaking : सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल

Breaking : सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे. काल रात्री त्याच्या छातीत पुन्हा दुखू लागले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.  काही दिवसांपूर्वी गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्याच्यावर कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर डिस्चार्ज घेऊन तो घरी परतला होता. पण, आता पुन्हा त्याच्या छातीत दूखायला लागले आहे. 

'' गांगुलीची प्रकृती स्थीर असून त्याला आता बरं वाटत आहे. कुटुंबीय व डॉक्टर यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि त्यामुळे पुढील काही दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे,''असे सूत्रांनी सांगितले. 
 

भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून दादाची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत दादानं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.

BCCIचा अध्यक्ष झाल्यानंतरही त्यानं अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.  

Read in English

Web Title: Sourav Ganguly being taken to Apollo Hospital in Kolkata after the BCCI president complained of chest pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.