KKRच्या फलंदाजाची इंग्लंडमध्ये फटकेबाजी; अवघ्या १५ चेंडूंत चोपल्या ७२ धावा, जाणून घ्या किती चेंडूत पूर्ण केले शतक!

कोलकाता नाईट रायडर्सकडून २०२०च्या आयपीएलमध्ये मोजकीच संधी मिळालेल्या २२ वर्षीय फलंदाजानं इंग्लंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:10 AM2021-06-29T11:10:48+5:302021-06-29T11:11:10+5:30

whatsapp join usJoin us
Somerset's Tom Banton smashed unbeaten 107 runs from 51 balls including 8 fours and 7 sixes against Kent in T20Blast | KKRच्या फलंदाजाची इंग्लंडमध्ये फटकेबाजी; अवघ्या १५ चेंडूंत चोपल्या ७२ धावा, जाणून घ्या किती चेंडूत पूर्ण केले शतक!

KKRच्या फलंदाजाची इंग्लंडमध्ये फटकेबाजी; अवघ्या १५ चेंडूंत चोपल्या ७२ धावा, जाणून घ्या किती चेंडूत पूर्ण केले शतक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता नाईट रायडर्सकडून २०२०च्या आयपीएलमध्ये मोजकीच संधी मिळालेल्या २२ वर्षीय फलंदाजानं इंग्लंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज टॉम बँटन ( Tom Banton) यानं ट्वेटी-२० ब्लास्ट ( T20 Blast) स्पर्धेत सोमवारी केंट क्लबच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. समरसेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर संघानं १६९ धावांचे लक्ष्य सहज पार केले. 

Salute : ८ वर्षांच्या मुलीला झाला कॅन्सर, तिच्या उपचारासाठी न्यूझीलंडचा खेळाडू WTC Finalच्या जर्सीचं करतोय लिलाव!

प्रथम फलंदाजी करताना झॅक क्रॅवली ( ३९), जोए डेन्ली ( ३६) यांनी दमदार खेळी करताना केंटला ८ बाद १६८ धावांपर्यंत मजल मारून दिली. समरसेटच्या लेवीस ग्रेगरीनं २७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. पण,  टॉम बँटन आणि डेव्हॉन कॉनवेय यांनी एकही विकेट न गमावता समरसेटला विजय मिळवून दिला. या दोघांनी १५.४ षटकांत १६९ धावांचे लक्ष्य पार केले.  बँटननं ४७ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्यानं ५१ चेंडूंत नाबाद १०७ धावा केल्या. त्यात ८ चौकार व ७ षटकारांचा समावेश आहे. कॉनवेय यानं ४४ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. 

Web Title: Somerset's Tom Banton smashed unbeaten 107 runs from 51 balls including 8 fours and 7 sixes against Kent in T20Blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.