Join us

म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण

२०१५ च्या आयपीएलमध्ये कायरन पोलार्डसोबत घडलेल्या एका गमतीदार घटनेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 15:31 IST

Open in App
ठळक मुद्दे२०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या या लढतीत घडली होती ही घटना ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड या कॅरेबियन खेळाडूंमध्ये झाली होती खडाखडी त्यानंतर कायरन पोलार्डने तोंडावर टेप लावत पंचांच्या शांत राहण्याच्या सूचनेस दिला होता प्रतिसाद

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट आणि लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगचे नियम या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या १३ व्या हंगामाला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे नव्या हंगामाच्या उत्सुकतेबरोबरच आयपीएलच्या आधीच्या १२ हंगामातील आठवणींनाही क्रिटेप्रेमींकडून उजाळा दिला जात आहे. दरम्यान, २०१५ च्या आयपीएलमध्ये कायरन पोलार्डसोबत घडलेल्या अशाच एका गमतीदार घटनेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यावेळी पोलार्डने भर मैदानात तोंडावर चिकटपट्टी लावून घेतली होती, त्या घटनेमागच्या कारणाचीही त्यावेळी खूप चर्चा झाली होती.२०१५ मध्ये बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या या लढतीत ही घटना घडली होती. त्यावेळी बंगळुरूकडून खेळणारा ख्रिस गेल आणि मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या कॅरेबियन खेळाडूंमध्ये खडाखडी झाली होती. २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बंगळुरूचा संघ मैदानात उतरल्यावर पोल्रार्डने गेलविरोधात शेरेबाजी करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, गेलनेही त्याला प्रत्युत्तर दिले होते.

मग मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि विनीत कुलकर्णी यांनी हस्तक्षेप केला. तसेच पोलार्डला शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर कायरन पोलार्डनेही तोंडावर टेप लावत पंचांच्या सूचनेस प्रतिसाद दिला. दरम्यान, पोलार्डच्या या कृतीला चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक आणि समालोचकांना भरभरून दाद दिली होती.अखेरीस या लढतीत मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १८ धावांनी मात दिली होती. या लढतीत टर्बनेटर हरभजन सिंह याला सामनावीर घोषित करण्यात आले होते.

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएलआयपीएल 2020