सांगली - भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह लांबणीवर गेल्याची वेगवेगळी कारणे सोशल मीडियातून समोर येत आहेत. स्मृतीने इन्स्टावरील सर्व पोस्ट ‘डीलीट’ केल्यानंतर संघातील मैत्रिणींनीदेखील पलाशला ‘अनफॉलो’ केले आहे. तशातच पलाश आणि कोरिओग्राफर मेरी डिकॉस्टा यांचे ‘चॅटिंग’देखील चांगलेच ‘व्हायरल’ झाले आहे. विवाह अन् दोघांच्या नात्याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
कमाल का टोपीबाज आदमी, पलाशवर टीका बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरके याने एका ट्वीटमध्ये स्मृतीने पलाशच्या काही गोष्टी पकडल्याचा उल्लेख केला आहे.तसेच, पलाशला उद्देशून ‘साला कमाल का टोपीबाज आदमी हैं, केवळ पब्लिसिटीसाठी तो स्मृतीशी लग्न करत होता,’ असा टोला लगावला आहे. या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. या पोस्टमुळे पलाशला केवळ प्रतिष्ठा आणि प्रसिध्दीसाठी स्मृतीशी विवाह करायचा होता का? असा प्रश्न पडतो.
‘चॅटिंग’च्या स्क्रीनशॉटवरून सोशल मीडियावर वादंग
स्मृती आणि पलाश यांच्या विवाहाची सर्व जय्यत तयारी झाली होती. मात्र, लग्नादिवशीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना तसेच पलाश यांची प्रकृती बिघडल्याने लग्न लांबणीवर टाकल्याची घोषणा करण्यात आली होती. अशातच कोरिओग्राफर मेरी डिकॉस्टा व पलाश यांच्यातील ‘चॅटिंग’च्या स्क्रीनशॉटवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. होणाऱ्या चर्चांबाबत मानधना कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. शिवाय स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी पलाशच्या कुटुंबातील कोणीही दोन दिवसांत आले नव्हते. स्मृतीने इन्स्टावरील सर्व पोस्ट हटविल्यानंतर क्रिकेट संघातील तिच्या मैत्रिणींनीसुद्धा पलाशला ‘अनफॉलो’ केल्याची बाब समाजमाध्यमावर व्हायरल झाली. दोन्ही कुटुंबांनी यातील कोणत्याही गोष्टीवर कसलेही स्पष्टीकरण दिले नाही. स्मृतीचे चाहते हा विवाह लांबणीवर गेल्याचे पाहून नाराज आहेत. च्याबाबतीत असे घडायला नको होते, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
Web Summary : Smriti Mandhana's wedding with Palash Mucchal faces uncertainty. Friends unfollowed Palash after deleted posts and viral chats surfaced, fueling doubts. Actor KRK criticized Palash, alleging he sought publicity through the marriage. No official statements have been released by either family.
Web Summary : स्मृति मंधाना और पलाश मुच्छल की शादी अनिश्चितताओं का सामना कर रही है। पोस्ट हटाने और वायरल चैट के बाद दोस्तों ने पलाश को अनफॉलो किया, जिससे संदेह बढ़ गया। अभिनेता केआरके ने पलाश की आलोचना करते हुए आरोप लगाया कि उन्होंने शादी के माध्यम से प्रचार मांगा। किसी भी परिवार द्वारा कोई आधिकारिक बयान जारी नहीं किया गया है।