Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

Smriti Palash World Cup Celebration: त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आधीही दिसलंय आता आदरही दिसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:20 IST2025-11-03T17:15:09+5:302025-11-03T17:20:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Smriti Mandhana Draped In Indian Flag By Palash Muchhal After ICC Women World Cup Final Video Goes Viral | Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

Smriti Mandhana Palash Muchhal Celebration: घरच्या मैदानात रंगलेल्या महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या १३ व्या हंगामातील अंतिम सामना जिंकत भारतीय महिला संघानं इतिहास रचला. भारतीय संघाला पहिली वहिली ट्रॉफी जिंकून देण्यात उप कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना हिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्मृती मानधना यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिली. तिने ९ सामन्यातील ९ डावात ४३४ धावा केल्या. या कामगिरीसह तिने विश्वचषक स्पर्धेच्या एका हंगामात भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक धावा करणारी बॅटरही ठरली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी 

ICC ची पहिली ट्रॉफी जिंकल्यावर स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड आणि होणारा पती पलाश मुच्छल याच्यासोबतचा मैदानातील खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर १८ क्रमांकाच्या जर्सीत टीम इंडियाक़ून मैदान गाजवणाऱ्या वनडे क्वीनची लव्हस्टोरी एकदम झक्कास आणि विरुष्काप्रमाणे 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी आहे, असे चित्र निर्माण होते. क्रिकेटच्या मैदानातील किंग विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. लग्नाआधीही अनुष्का विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी अनेकदा स्टेडियम स्टँडवर स्पॉट झाली. लग्नानंतही ती सातत्याने विराटला सपोर्ट करताना दिसली. किंग कोहलीनं तर अनेकदा आपल्या कामगिरीच श्रेय अनुष्काला दिल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी याच धाटणीत 'वनडे क्वीन'चीही लव्हस्टोरी फुलली आहे.

ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास

आता मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल


 

आयसीसीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्मृती मानधनाचा एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा  पलाश मुच्छल ट्रॉफी उंचावून नटलेल्या स्मृतीचं खास अंदाजात अभिनंदन करताना दिसून येते. स्मृती आणि पलाश यांच्यातील प्रेमाची मिठी दोघांच्यातील खास बॉन्डिंगची झलक दाखवणारी होती. एवढेच नाही तर पलाशनं तिरंगा स्मृतीकडे देत तिच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल दाखवलेल्या सन्मानाची भावनाही लक्षवेधी ठरतीये. 

त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आधीही दिसलंय, आता आदरही दिसला

मागील दोन वर्षांपासून स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांची लव्हस्टोरी चर्चेचा विषय ठरली. ही जोडी लवकरच लग्नबंधात अडकणार असल्याचेही समोर आले आहे. त्याआधी पलाशनं स्मृतीवर दाखवलेले प्रेम आणि तिच्याबद्दल त्याच्या मनात असलेली आदराची भावना या गोष्टी 'परफेक्ट कपल गोल'ची सर्वोत्तम टिप्सच आहे.
 

Web Title : स्मृति मंधाना की प्रेम कहानी: 'वनडे क्वीन' और पलाश का वायरल वीडियो।

Web Summary : स्मृति मंधाना और पलाश मुच्छल के कथित रिश्ते ने भारत की विश्व कप जीत के बाद चर्चा बटोरी। एक वीडियो में मुच्छल मंधाना को बधाई देते हुए दिख रहे हैं, जिससे विराट कोहली और अनुष्का शर्मा के सहायक रिश्ते की तुलना हो रही है, जो एक 'परफेक्ट कपल गोल' का संकेत दे रहा है।

Web Title : Smriti Mandhana's Love Story: 'One Day Queen' and Palash's Viral Video.

Web Summary : Smriti Mandhana's rumored relationship with Palash Muchhal is creating buzz after India's World Cup win. A video shows Muchhal congratulating Mandhana, drawing comparisons to Virat Kohli and Anushka Sharma's supportive relationship, hinting at a 'perfect couple goal'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.