Smriti Mandhana Becomes Fastest Batter In The World To Score 5000 Runs : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात तलवार म्यान करणाऱ्या स्मृती मानधनानं ऑस्ट्रेलियन संघा विरुद्ध तुफान फटकेबाजीसह पहिल्या तीन धावांतील कसर भरून काढली. विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेपेक जिंकून भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचे निमिंत्रण दिल्यावर सांगलीकर स्मृती मानधनाची बॅट चांगलीच तळपली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एक्स्प्रेस वेगानं गाठला ५००० धावांचा पल्ला
प्रत्येक सामन्यात विक्रम सेट करताना दिसलेल्या स्मृतीनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्ड सेट केले. यात महिला वनडेत ५००० धावांचा पल्ला गाठण्यासोबतच एका कॅलेंडर ईयरमध्ये १००० धावा करण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डचा समावेश आहे. इथं एक नजर टाकुयात एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत तिने सेट केलेल्या खास विक्रमावर....
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
चारचौघींवर पडली भारी!
स्मृती मानधना मागील दोन वर्षांपासून सातत्याने दमदार कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात कडक फटकेबाजीसह तिने सेंच्युरी मारण्याचे संकेत दिले होते. पण ८० धावांवर ती बाद झाली. शतक हुकले असले तरी त्याआधी तिने मोठा डाव साधला. महिला वनडेत ५००० धावा करणारी ती पाचवी बॅटर ठरली. एवढेच नाही तर याआधी या यादीत स्थान मिळवणाऱ्या चौघींपेक्षा ती भारी ठरली.
स्मृतीनं मोडला स्टेफनी टेलरचा विक्रम
स्मृतीनं महिला वनडेत सर्वात जलदगतीने ५००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरच्या नावे होता. स्टेफीनं १२९ डावात हा पल्ला गाठला होता. स्मृती मानधना हिने अवघ्या ११२ डावात हा मेलाचा पल्ला सर केला आहे.
महिला वनडेत ५००० धावा करताना कुणी किती डाव अन् चेंडू खेळले?
खेळाडू | संघ | खेळलेले डाव | खेळलेले चेंडू |
---|
मिताली राज | भारत | २३२ | ७,८०५ |
शार्लट एडवर्ड्स | इंग्लंड | १९१ | ५,९९२ |
सुझी बेट्स | न्यूझीलंड | १७३ | ५,८९६ |
स्टेफनी टेलर | वेस्ट इंडिज | १७० | ५,८७३ |
स्मृती मानधना | भारत | ११२* | ५,००४* |