भारतीय महिला क्रिकेट संघानं दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर दणदणीत विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. दक्षिण आफ्रिकेचा डाव १५७ धावांवर गुंडाळल्यानंतर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि पूनम राऊत ( Punam Raut) या महाराष्ट्राच्या पोरींनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघींच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं ९ विकेट्स व १२८ चेंडू राखून सामना जिंकला. भारतानं २८.४ षटकांत १ बाद १६० धावा करून सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात मानधनानं वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. आतापर्यंत पुरुष/महिला क्रिकेपटूंपैकी कुणालाच हा विक्रम नोंदवता आला नव्हता. ( first player to score 10 consecutive fifties in ODI run-chases) जसप्रीत बुमाराह Wed संजना गणेशन, सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकन संघाला झुलन गोस्वामी ( ४-४२) व राजेश्वरी गायकवाड ( ३-३७) यांनी धक्के दिले. कर्णधार सून लूस ( ३६) आणि लारा गूडऑल ( ४९) यांच्याव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांसमोर कुणीच टीकले नाही. आफ्रिकेचा डाव ४१ षटकांत १५७ धावांवर गुंडाळला. मानसी जोशीनं दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर स्मृती मानधना ( नाबाद ८० धावा, ६४ चेंडू, १० चौकार व ३ षटकार) आणि पूनम राऊत ( नाबाद ६२ धावा, ८९ चेंडू, ८ चौकार) यांनी फटकेबाजी करून भारताला सहज विजय मिळवून दिला.
स्मृती मानधनाचा वर्ल्ड रेकॉर्ड ( Smriti Mandhana's last 10 scores in ODI run-chases)
धावांचा पाठलाग करताना सलग दहा सामन्यांत अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड स्मृतीनं आज नावावर केला. विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही पुरुष किंवा महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही आणि स्मृतीनं पहिला मान पटकावला.
मागील दहा सामन्यांतील कामगिरी ( धावांचा पाठलाग करताना)
नाबाद ८० वि. दक्षिण आफ्रिका
७४ वि. वेस्ट इंडिज
६३ वि. इंग्लंड
नाबाद ९० वि. न्यूझीलंड
१०५ वि. न्यूझीलंड
नाबाद ७३ वि. श्रीलंका
नाबाद ५३ वि. इंग्लंड
८६ वि. इंग्लंड
५२ वि. ऑस्ट्रेलिया
६७ वि. ऑस्ट्रेलिया