Join us

स्मिथने फसवणूक केलेली नाही, सौरव गांगुलीने व्यक्त केली सहानुभूती

स्मिथबद्दल मला सहानुभूती आहे. कारण स्मिथ हा एक चांगला खेळाडू आहे आणि मला अशी आशा आहे की तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे गांगुलीला वाटते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 18:54 IST

Open in App
ठळक मुद्देक्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांना एका वर्षाची बंदी घातली आहे, त्यामुळे या दोघांना यंदा आयपीएलमध्येही सहभागी होता येणार नाही.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने स्टीव्हन स्मिथबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. त्याचबरोबर स्मिथने कोणतीच फसवणूक केलेली नाही, असे गांगुलीने म्हटले आहे. 'अ सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरीत्राच्या अनावरणप्रसंगी गांगुली बोलत होता.

" स्मिथबद्दल मला सहानुभूती आहे. कारण स्मिथ हा एक चांगला खेळाडू आहे आणि मला अशी आशा आहे की तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. स्मिथने कोणत्याही प्रकारची फसवणूक केली, असे मला वाटत नाही, " असे गांगुली म्हणाला.

काय आहे प्रकरणकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा  डागाळली. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांना एका वर्षाची बंदी घातली आहे, त्यामुळे या दोघांना यंदा आयपीएलमध्येही सहभागी होता येणार नाही.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथसौरभ गांगुली