सिडनी : ‘आॅस्ट्रेलियन क्रिकेटला माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथची गरज असून त्याचे मोठ्या मनाने स्वागत करण्यात येईल, पण डेव्हिड वॉर्नरचा मार्ग मात्र खडतर होऊ शकतो,’ असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने व्यक्त केले.
मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेत चेंडू छेडछाड प्रकरणात सहभागी असल्यामुळे या दोन खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय व राज्य क्रिकेट संघटनांनी प्रत्येकी एक वर्षांची बंदी घातली आहे. सलामीवीर फलंदाज कॅमरन बेनक्राफ्टवर नऊ महिन्यांची निलंबनाची कारवाई करण्यात आली. ६४ कसोट सामने खेळणाऱ्या स्मिथबाबत बोलताना वॉ म्हणाला,‘आॅस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये त्याचे पुनरागमन गरजेचे आहे. एका रात्रीत त्याच्या पातळीचा खेळाडू गमावून त्याचा पर्याय शोधण्याची आशा बाळगू शकत नाही. तो अद्याप युवा आहे.’ (वृत्तसंस्था)