भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे. दरम्यान, केरळविरुद्ध सामन्यात मुंबईच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी सूर्यकुमार यादवच्या नावावर मोठा विक्रम नोंदवण्यात आला आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केरळने मुंबईसमोर १७८ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ १६३ धावांवर गारद झाला. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत चार चौकारांसह ३२ धावा केल्या, ज्यात चार चौकारांचा समावेश आहे. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. तसेच त्याने आदित्य तरेचा विक्रम
सूर्यकुमार २०१० पासून मुंबईसाठी टी-२० क्रिकेट खेळत आहे. त्याने आतापर्यंत ७१ सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले असून १ हजार ७१७ धावा केल्या आहेत, ज्यात नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला चिरडून टाकण्याची क्षमता त्याच्यात आहे.