Join us
Daily Top 2Weekly Top 5

SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंड रचला इतिहास

अखेरच्या षटकात अनुकूल-रॉबिन मिंझचा धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:31 IST

Open in App

 Jharkhand Set Record Highest Ever Total In a SMAT Final vs Haryana : ईशान किशनच दमदार शतक आणि कुमार कुशाग्रच्या धमाकेदार अर्धशतकानंतर अन्य अनुकूल रॉय आणि रॉबिन मिझ यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर झारखंडच्या संघाने  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये विक्रमी धावसंख्या उभारली आहे. पुण्यातील  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात झारखंड विरुद्ध हरयाणा यांच्यातील फायनल सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

विराट सोडून बॅटिंगला आलेल्या सर्वांनी २०० च्या स्ट्राइक रेटनं केल्या धावा अन्...

नाणेफेक गावल्यावर या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर झारखंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार ईशान किशनच्या साथीनं संघाच्या डावाची सुरुवात करताना विराट सिंह अवघ्या २ धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर ईशान किशनसह फलंदाजीला आलेल्या प्रत्येकाने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह धावा करत संघाच्या धावफलकावर ३ बाद २६२ धावसंख्या लावली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.  

Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'

ईशान आणि कुमार कुशाग्र जोडीची विक्रमी भागीदारी

सलामीवीर विराट सिंह स्वस्तात माघारी फिरल्यावर ईशान आणि कुमार कुशाग्र जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ चेंडूत १७७ धावांची भागीदारी केली. ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमधील सर्वोच्च भागीदारी ठरली.  ईशान किशन याने ४७ चेंडूत १०१ धावा केल्या. तो आपलं काम करून परतल्यावर त्याच्यापाठोपाठ कुमार कुशाग्रच्या रुपात झारखंडच्या संघाने दुसरी तिसरी विकेट गमावली. त्याने ३८ चेंडूत ८१ धावांची दमदार खेळी केली.

अखेरच्या षटकात अनुकूल-रॉबिन मिंझचा धमाका!

ईशान किशन आणि कुमार कुशाग्रनं तगडी सुरुवात करून दिल्यावर अखेरच्या षटकात अनुकूल रॉयनं २० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. याशिवाय रॉबिन मिंझ याने १४ चेंडूत केलेल्या ३१ धावांच्या जोरावर झारखंडच्या संघाने धावफलकावर विक्रमी धावसंख्या लावली.

 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या

  • २६२/३- झारखंड विरुद्ध हरियाणा- २०२५ (पुणे)  
  • २२३/४ - पंजाब विरुद्ध बडोदा- २०२३  (मोहाली) 
  • २०३/७ बडोदा विरुद्ध पंजाब- २०२३ (मोहाली)   
English
हिंदी सारांश
Web Title : SMAT Final: Jharkhand's Record Score, Kishan's Century, Haryana Defeated

Web Summary : Jharkhand set a Syed Mushtaq Ali Trophy final record, scoring 262/3 against Haryana. Ishan Kishan's century (101 off 47) and Kumar Kushagra's 81 powered the team. Except for Virat Singh, every batter achieved a 200+ strike rate, sealing Jharkhand's historic win.
टॅग्स :बीसीसीआयटी-20 क्रिकेटइशान किशन