Join us

SL vs IND : सिराज vs मेंडिस! भारतीय गोलंदाज आणि श्रीलंकेचा फलंदाज भिडला, एकच बाचाबाची

SL vs IND 3rd ODI : मोहम्मद सिराज आणि श्रीलंकेचा खेळाडू भिडला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 19:54 IST

Open in App

SL vs IND 3rd ODI Live Match | कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वन डे सामना नाना कारणांनी चर्चेत आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक धावसंख्या उभारली. श्रीलंकन फलंदाजांचा रूद्रावतार क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधून गेला. अशातच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि श्रीलंकेच्या कुसल मेंडिस यांच्यात बाचाबाची झाली. या दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्याच्या पुढच्याच चेंडूवर सिराजने सदीरा समरविक्रमाला बाहेरचा रस्ता दाखवला. 

खरे तर ३९व्या षटकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सिराज आणि मेंडिस यांच्यात बाचाबाची झाली. मेंडिसला सिराजचा चेंडू खेळता न आल्याने सिराजने त्याला खुन्नस देण्याचा प्रयत्न केला. मग मेंडिसने एक धाव काढून दुसऱ्या टोकाला जाणे पसंत केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर सिराजने समरविक्रमाची शिकार केली. सिराजला काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने ९ षटकांत ७८ धावा देत एक बळी घेतला. 

श्रीलंकेने उभारली सन्मानजनक धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. याशिवाय पथुम निसांका (४५), कुसल मेंडिस (५९), चरिथ असलंका (१०), सदीरा समरविक्रमा (०), जनिथ लियानगे (८), डुनिथ वेललेज (२), कामिंदू मेंडिस (नाबाद २३ धावा) आणि महेश तीक्ष्णा ३ धावा करून नाबाद परतला. भारताकडून रियान परागने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. 

श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानगे, कामिंदू मेंडिस, डुनिथ वेलालगे, महेश तीक्ष्णा, जेफरी वांडरस, असिथा फर्नांडो.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकामोहम्मद सिराजसोशल व्हायरलभारतीय क्रिकेट संघ