Join us

BREAKING: भारत-श्रीलंका मालिकेला धक्का; कोरोनाचा शिरकाव, वेळापत्रक पुढे ढकलण्याच्या हालचाली

IND vs SRI: भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला मोठा धक्का बसला आहे. मालिकेच्या वेळापत्रात बदल होण्याची दाट शक्यता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 20:37 IST

Open in App

IND vs SRI: भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे मालिकेच्या वेळापत्रक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती 'क्रिकबज'नं दिली आहे. (SL vs IND 2021: India Tour Of Sri Lanka Set To Be Rescheduled)

भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे. भारतीय संघातील खेळाडू सध्या क्वारंटाइन नियमांचं पालन करत आहेत. कोरोना प्रादुर्भावासंदर्भातील सर्व काळजी घेतली जात असतानाही श्रीलंकेच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निर्धारित वेळापत्रकात आता बदल करण्याची नामुष्की ओढावली आहे. 

भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका १३ जुलैपासून सुरू होणार होती. पण आता ही मालिका १७ किंवा १८ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून क्वारंटाइनचा कालावधी आणखी वाढविण्याचा निर्णय श्रीलंकेच्या क्रिकेटबोर्डानं घेतला आहे. श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅट फ्लावर आणि संघ विश्लेषक यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. इंग्लंड दौऱ्याहून मायदेशात परतल्यानंतर दोघंही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. 

श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाकडून लवकरच मालिकेचं नवं वेळापत्रक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने होणार आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशिखर धवनभारतीय क्रिकेट संघकोरोना वायरस बातम्या