SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

हाँगकाँगच्या संघानं ६ कॅच सोडले, निसंका रन आउट झाला अन् मॅचमध्ये नवे ट्विस्ट आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 00:26 IST2025-09-16T00:08:22+5:302025-09-16T00:26:23+5:30

whatsapp join usJoin us
SL vs HK Sri Lanka vs Hong Kong, 8th Match Opener Pathum Nissanka struck 68 as Sri Lanka beat Hong Kong by four wickets in their Asia Cup 2025 | SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sri Lanka vs Hong Kong, 8th Match : आशिया चषक स्पर्धेत फक्त श्रीलंकेचा संघच सूर्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला चांगली टक्कर देऊ शकेल,  अशी चर्चा रंगत आहे. पण हाँगकाँगच्या संघासमोर त्यांचे धाबे दणाणले होते. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेतील आठव्या सामन्यात हाँगकाँगच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर १५० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर पथुम निसंकानं सलग दुसरे अर्धशतक झळकावले. पण तो धावबाद झाला अन् सामन्यात कमालीचे ट्विस्ट आले. अखेरच्या षटकात एकापाठोपाठ विकेट पडत असताना ड्रेसिंग रुममध्ये कोच सनथ जयसूर्याचंही टेन्शनमध्ये दिसला. पण एक नो बॉल पडला अन् तिथं सामना पुन्हा श्रीलंकेच्या बाजूनं फिरला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

हाँगकाँगच्या संघानं ६ कॅच सोडले, निसंका रन आउट झाला अन् मॅचमध्ये नवे ट्विस्ट आले

१५० धावांचा बचाव करताना हाँगकाँगच्या संघाने या सामन्यात ६ सोपे झेल सोडले.  यात चार कॅच तर निसंकाचेच होते. याचा फायदा उठवत त्याने अर्धशतकी खेळीसह सामना श्रीलंकेच्या बाजूनं सेट केला. पण ४४ चेंडूत ६८ धावा करून तो परतल्यावर हाँगकाँग कमाल करेल, असे चित्र निर्माण झाले. १५ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर निसंकाच्या रुपात ११९ धावांवर श्रीलंकेच्या संघाने तिसरी विकेट गमावली. ही विकेट पडल्यावर श्रीलंकेच्या संघाने अवघ्या ८ धावांत ३ विकेट्स गमावल्या अन् संघाची  अवस्था ७ बाद १२७ अशी झाली होती. 

... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात

एक नो बॉल पडला अन् श्रीलंकेसह जयसूर्या टेन्शन फ्री झाला

अखेरच्या १८ चेंडूत २३ धावांची आवश्यकता असताना श्रीलंकेच्या ताफ्यात धाकधूक वाढली होती. १८ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार यासिम मोर्तुझा याने  कामिंदू मेंडिसच्या  रुपात श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी हसरंगा मैदानात उतरला. याच षटकात श्रीलंकन बॅटर्सवर दबाव निर्माण झाला होता.ड्रेसिंग रुममध्ये मुख्य कोच जयसूर्या टेन्शनमध्ये दिसला. पण याच षटकातील तिसऱ्या चेंडू नो बॉल पडला. फ्री हिटचा फायदा उचलत हसरंगाने षटकार मारला अन् श्रीलंकेसह कोच जयसूर्याला मोठा दिलासा मिळाला. तळ्यात मळ्यात अशा परिस्थितीतून हसरंगाने संघाला ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या सामन्यातील पराभवासह हाँगकाँगचा या स्पर्धेतील प्रवास इथंच संपुष्टात आला आहे.

 

Web Title: SL vs HK Sri Lanka vs Hong Kong, 8th Match Opener Pathum Nissanka struck 68 as Sri Lanka beat Hong Kong by four wickets in their Asia Cup 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.