SL vs BAN : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या हंगामातील पहिला कसोटी सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात गॉल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने नवा इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शांतोनं दोन्ही डावात शतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातलीये. अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा तो पहिला कर्णधार ठरला आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसऱ्यांदा साधला दोन्ही डावात शतकी खेळी करण्याचा डाव
बांगलादेशच्या पहिल्या डावात नजमुल हुसेन याने पहिल्या डावात १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४८ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १२५ धावा करत दोन्ही डावांत शतकी खेळीसह खास विक्रम आपल्या नावे केला. खास गोष्ट ही की, दुसऱ्यांदा त्याने ही कामगिरी केली आहे. याआधी २०२३ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता. फरक एवढाच की, त्यावेळी तो बांगलादेश संघाचा कर्णधार नव्हता.
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
सामना अनिर्णित
गॉलेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावात ४८५ धावा केल्या होत्या. यात कर्णधार शांतो १४८ (२७९) आणि मुशफिकीर रहिम १६३ (३५०) या दोघांच्या शतकी खेळीचा समावेश होता. श्रीलंकेच्या संघानं पथुम निसंकाच्या १८७ धावांसह कामिंदू मेंडिसनं केलेल्या ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ४८५ धावांपर्यंत मजल मारली. १० धावांच्या अल्प आघाडीसह दुसऱ्या डावात बांगलादेशच्या संघाने ६ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला. यात शांतेच्या शतकाचा समावेश होता. श्रीलंकेच्या संघानं दुसऱ्या डावात पाचव्या दिवसाअखेर ४ विकेट्सच्या मोबदल्यात ७२ धावा केल्या, हा सामना अनिर्धित राहिला.