SL vs AUS, 1st Test, Steven Smith Historic Landmark With 10 Thousand Test Runs : टीम इंडिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत मोठा डाव साधण्याची संधी हुकलेल्या स्टीव्ह स्मिथनं श्रीलंकेच्या मैदानात १० धावांचा टप्पा पार करत खास क्लबमध्ये एन्ट्री मारली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खाते उघडताच त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत हुकली होती संधी, आता श्रीलंकेच्या मैदानात साधला डाव
टीम इंडिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर स्पर्धेतील जेतेपदासह ऑस्ट्रेलियन संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच तिकीट बूक केल्याचे पाहायला मिळाले. पाच सामन्यांच्या या मालिकेतील सिडनी कसोटीत स्टीव्ह स्मिथला १० हजार धावांचा पल्ला गाठण्याची संधी होती. पण टीम इंडियाविरुद्ध हा पराक्रम करणं त्याला जमलं नव्हतं. अखेर श्रीलंकेच्या मैदानात त्याने हा डाव साधला आहे.
...अन् स्मिथनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केलं 'ओव्हरटेक'
स्टीव्ह स्मिथ हा कसोटीत १० हजार धावांचा टप्पा पार करणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा तर एकंदरीत १५ वा क्रिकेटर आहे. १० हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या खास क्लबमध्ये एन्ट्री करताना स्मिथनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० सामन्यासह सर्वाधिक १५९२१ धावाचा वर्ल्ड रेकॉर्ड हा आजही सचिनच्या नावे आहे. पण स्मिथनं सर्वात जलदगतीने १० हजार धावांचा पल्ला गाठण्यात सचिनला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरनं हा पल्ला गाठण्यासाठी १२२ कसोटी सामन्यातील १९५ डावात १० हजार धावा केल्या होत्या. स्मिथनं ११५ व्या सामन्यातील २०५ डावात हा पराक्रम आपल्या नावे केला आहे.
सर्वात जलद १० हजार धावांचा पल्ला गाठणारा पाचवा बॅटर ठरला स्मिथ
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावे आहे. त्याने १११ कसोटी सामन्यातील १९५ डावात दहा हजार धावांचा पल्ला गाठला होता. श्रीलंकेचा कुमार संगकारान ११५ सामन्यातील १९५ डावात हा आकडा गाठला होता. स्मिथ श्रीलंकनं स्मिथसोब संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ या यादीत यूनिस खान (११६ सामने), रिकी पॉन्टिंग (११८ सामने), जो रुट (११८ सामने), राहुल द्रविड (१२० सामने) आणि सचिन तेंडुलकर (१२२ सामने) या दिग्गजांचा नंबर लागतो.