SL vs AUS 5th ODI : ऑस्ट्रेलियाचा पलटवार, श्रीलंकेची उडवली दाणादाण; Chamika Karunaratne एकटा लढला शिलेदार!

Sri Lanka vs Australia 5th ODI : ०-१ अशा पिछाडीवरून सलग तीन वन डे सामने जिंकून श्रीलंकेने ३० वर्षांनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:55 PM2022-06-24T17:55:32+5:302022-06-24T18:06:12+5:30

whatsapp join usJoin us
SL vs AUS 5th ODI : Sri Lanka was 62 for 7 then Chamika Karunaratne played a great knock - 75 runs, set 161 runs target to Australia | SL vs AUS 5th ODI : ऑस्ट्रेलियाचा पलटवार, श्रीलंकेची उडवली दाणादाण; Chamika Karunaratne एकटा लढला शिलेदार!

SL vs AUS 5th ODI : ऑस्ट्रेलियाचा पलटवार, श्रीलंकेची उडवली दाणादाण; Chamika Karunaratne एकटा लढला शिलेदार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sri Lanka vs Australia 5th ODI : ०-१ अशा पिछाडीवरून सलग तीन वन डे सामने जिंकून श्रीलंकेने ३० वर्षांनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे पाचव्या वन डे सामन्याला फार अर्थ उरला नव्हता. पण, पराभवामुळे चवताळलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेची दाणादाण उडवून टाकली. जोश हेझलवूड व मॅथ्यू कुह्नेमन यांनी धक्के दिल्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज गोंधळले आणि त्यामुळे त्यांच्या दोन विकेट्स याच गोंधळात रन आऊट होऊन पडल्या.

कोलंबो येथेली RPS स्टेडियमवरील श्रीलंकेची सर्वात निचांक खेळी ही १९९३ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वबाद ९८ अशी होती आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९८५मध्ये ते एडलेड कसोटीत ९१ धावांवर ऑल आऊट झाले होते. आज हे विक्रम मोडले जातील अशी परिस्थिती दिसत होती. त्यांच्या ७ विकेट्स ६२ धावांवर माघारी परतले होते. कुसल मेंडिसने ( २६) खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर तो हिट विकेट झाला. चरिथ असलंका व जेफ्री वंदेर्साय हे रन आऊट झाले.


चमिका करुणारत्नेने १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या प्रमोद मधुशानसोबत ऑसी गोलंदाजांचा सामना केला. करुणारत्नेने ६३ चेंडूंत वन डे तील पहिले अर्धशतक झळकावले. करुणारत्ने व मधुशान यांची १०१ चेंडूंतील ५८ धावांची भागीदारी कॅमेरून ग्रीनने संपुष्टात आणली. ७५ चेंडूंत ८ चौकार व २ षटकार खेचून ७५ धावा करणाऱ्या करुणारत्नेच्या विकेटने श्रीलंकेचा डाव संपुष्टात आला. ७ बाद ६२ वरून करुणारत्नेने संघाला १६० धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: SL vs AUS 5th ODI : Sri Lanka was 62 for 7 then Chamika Karunaratne played a great knock - 75 runs, set 161 runs target to Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.