Join us

Video : भारताची लेक अन् पाकिस्तानच्या सूनेला पाहून सायमन डॉलने ऑन-एअर केली कमेंट; संतापले फॅन्स

पाकिस्तान सुपर लीगमध्ये  बुधवारी रेकॉर्डब्रेक खेळ झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:05 IST

Open in App

पाकिस्तान सुपर लीगमध्ये  बुधवारी रेकॉर्डब्रेक खेळ झाला. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने PSL मधील विक्रमी धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून ६३ चेंडूत १४५ धावांची नाबाद खेळी करत संघाला थरारक विजय मिळवून दिला. जेसन रॉयच्या शतकाच्या बळावर क्वेटाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीचा आठ गडी राखून पराभव केला. जेसन रॉयच्या या रेकॉर्ड ब्रेकिंग खेळीने बाबर आजमचे शतक व्यर्थ ठरवले. पण, या सामन्यापेक्षा आता वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीची भारतीय पत्नी सामिया आरजू सध्या खूप चर्चेत आली आहे.

यामागचं कारण आहे समालोचक सायमन डॉल, ज्याने तिला पाहताच Wow, Wow, Wow असे ऑन एअर म्हणायला सुरुवात केली.  इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान यांच्यात खेळल्या गेलेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात डॉलने हसन अलीच्या पत्नीवर ऑन एअर कॉमेंट केली होती. इस्लामाबादने मुलतानवर रोमहर्षक विजय नोंदवला होता. 

विजयी संघ जेव्हा विजयाचा आनंद साजरा करत होता, तेव्हा डॉल कॉमेंट्री करत होता. त्याचवेळी हसन अलीची पत्नी सामियावर कॅमेरा फोकस झाला. सामियाला पाहताच डॉलच्या तोंडातून Wow बाहेर पडले. सामियासाठी तो म्हणाला की, तिने हा सामना जिंकला आहे. मला वाटते की तिने येथेही काही मन जिंकले आहे. खूप छान आणि अप्रतिम. विजयही जोरदार होता. सामियाबद्दल बोलायचे झाले तर ती हरियाणाची आहे. २०१९ मध्ये तिने दुबईत हसन अलीशी लग्न केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेट
Open in App