Shubman Gill's India Equal Test Cricket World Record : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह खास विक्रमाला गवसणी घातली. दिल्लीच्या मैदानात भारतीय संघाने कसोटीतील सलग १४ वा विजय नोंदवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका मैदानात सर्वाधिक सामने जिंकण्याचा खास विक्रम टीम इंडियाच्या नावे झाला. याशिवाय भारतीय संघाने एका संघाला सर्वाधिक वेळा पराभूत करण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी साधली आहे. एक नजर टाकुयात टीम इंडियाच्या या खास रेकॉर्डवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियानं दिल्लीच्या मैदानात साधला एका मैदानात सलग सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा डाव
भारतीय संघाने १९९३ पासून आतापर्यंत दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियवर खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात सलग १४ विजयाची नोंद केली आहे. त्याच्या पाठोपाठ मोहालीच्या आय एस बिंद्रा स्टेडियमचा नंबर लागतो. १९९७ पासून इथं टीम इंडियाने सलग १३ विजय नोंदवल्याचा विक्रम आहे. मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर १९४८ ते १९६५ च्या दरम्यान भारतीय संघाने सलग १३ कसोटी सामने जिंकले होते.
टीम इंडियानं साधला मोठा डाव, दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला घरच्या मैदानावर सलग दहाव्यांदा पराभूत केलं आहे. दक्षिण आफ्रेकेनंतर एका संघाला सर्वाधिक वेळा पराभूत करण्याचा पराक्रम टीम इंडियाने करून दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही १९९८ ते २०२४ दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्धच १० सामने जिंकले होते. भारतीय संघाने २००२ पासून वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात एकही मालिका जिंकू दिलेली नाही. पुढच्या दौऱ्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत हा खास वर्ल्ड रेकॉर्ड सहज आपल्या नावे करेल.
सलग सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे संघ
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (२००२ – २०२५)* - सलग १० विजय
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (१९९-२०२४)- सलग - १० विजय
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज (२०००-२०२२ - सलग ९ विजय
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (१९८९-२००३)- सलग ८ विजय
- श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे (१९९६-२०२०)- सलग ८ विजय
Web Summary : India's victory in Delhi marked their 14th consecutive Test win at the venue, equaling a world record. They've also matched South Africa by defeating West Indies ten consecutive times at home, showcasing their dominance in Test cricket.
Web Summary : दिल्ली में भारत की जीत ने इस मैदान पर उनकी लगातार 14वीं टेस्ट जीत दर्ज की, जो एक विश्व रिकॉर्ड के बराबर है। उन्होंने दक्षिण अफ्रीका की बराबरी करते हुए वेस्टइंडीज को घर में लगातार दस बार हराया, जो टेस्ट क्रिकेट में उनके प्रभुत्व को दर्शाता है।