Shubman Gill Lords Jersey Aauction Red And Tuth Foundation : इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून शुबमन गिलनं कॅप्टन्सीतील आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. मोठी जबाबदारी खांद्यावर पडल्यावर दमदार फलंदाजीचा नजराणा पेश करत त्याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत ४ शतकाच्या मदतीने सर्वाधिक धावा ठोकल्या. या मालिकेत ७५४ धावा करणाऱ्या गिलला भारताकडून मालिकावीरचा पुरस्कारही मिळाला. आता क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानातील कसोटी सामन्यात त्याने जी जर्सी घातली होती त्यासंदर्भातील खास माहिती समोर आलीये. इंग्लंडमध्ये लिलावात काढण्यात आलेल्या त्याच्या जर्सीला सर्वाधिक किंमत मिळालीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्रिकेटच्या पंढरीत कॅन्सरला मात देण्यासाठी राबविला जातो खास उपक्रम
प्रत्येक वर्षी लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यातील एक दिवस हा इंग्लंडचे माजी कर्णधार अँड्रू स्ट्रॉस यांच्या रेड अँड रथ नावाच्या चॅरिटी ट्रस्टठी राखीव ठेवला जातो. या दिग्गज क्रिकेटरच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. कॅॅन्सरचा सामना करणाऱ्यांना मदत मिळावी, या हेतूनं या संस्थेकडून निधी उभारण्यात येतो. हा निधी उभारण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्यानंतर भारत-इंग्लंड दोन्ही संघातील खेळाडूंच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. यात शुबमन गिलच्या जर्सीला सर्वाधिक किंमत मिळाली.
३० महिन्यांपासून टीम इंडियासोबत; पण प्रत्येक वेळी बाकावरच! त्याला कोच गंभीर यांनी दिलाय शब्द
गिलच्या जर्सीसाठी किती लागली बोली
गिलने लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात घातलेल्या टी शर्टला लिलावात जवळपास ५ लाख ४१ हजार रुपये मिळाले आहेत. खेळाडूंच्या टी शर्ट शिवाय रेड फॉर रथ नावाच्या चॅरिटी ट्रस्टकडून घेण्यात आलेल्या लिलावात कॅप, बॅट आणि तिकीटांचीही विक्री झाली.
बुमराह आणि जडेजा दुसऱ्या स्थानावर
भारताचा ताफ्यातील जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या दोघांच्या जर्सीचाही लिलावात समावेश होता. दोघांच्या जर्सीसाठी ४.७० लाख एवढी बोली लागली. इंग्लंडच्या ताफ्यातील खेळाडूंमध्ये जो रुटच्या टी शर्टला सर्वाधिक ४.४७ लाख एवढी किंमत मिळाली.
रुट अन् पंतच्या कॅपसाठीही लागली मोठी बोली
कॅप्समध्ये रूटची स्वाक्षरी असणारी कॅप सर्वात महागडी ठरली. त्याच्या कॅपसाठी ३.५२ कोटी एवढी बोली लागली. याशिवाय रिषभ पंतची कॅप १.७६ लाख रुपयांना विकली गेली.