Shubman Gill IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने रविवारी आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले. हार्दिकने अष्टपैलू कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर डेव्हिड मिलर व शुबमन गिल ( Shubman Gill) यांनी अखेरपर्यंत खिंड लढवून राजस्थान रॉयल्सचा पराभव निश्चित केला. गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानला ९ बाद १३० धावांवर रोखले आणि त्यानंतर हार्दिक, मिलर व गिल यांनी १८.१ षटकांत हे लक्ष्य पार केले. गिलने खणखणीत षटकार मारून विजय मिळवून दिला आणि हेल्मेट काढून सेलिब्रेशन केलं. त्याचं हे सेलिब्रेशन पाहून चाहत्यांना विराट कोहली आठवला अन् त्यांनी गिलला Prince Gill असे टोपणनाव दिले.
प्रत्युत्तरात वृद्धीमान साहा ( ५) व मॅथ्यू वेड ( ८) लगेच माघारी परतले. शुबमनला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले. हार्दिक व शुबमनने ५३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून गुजरातसाठी पाया सेट केला. त्यानंतर शुबमन व डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत नाबाद ४७ धावांची भागीदारी करून गुजरातचा ७ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय पक्का केला. गिल ४५ धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने १९ चेंडूंत नाबाद ३२ धावा केल्या. गिलने या स्पर्धेत १६ सामन्यांत ३४.५० सरासरीने ४८३ धावा केल्या.
पाहा गिलचे सेलिब्रेशन