Shubman Gill IPL 2022 : गुजरातला जेतेपद मिळवून देताच शुबमन गिलच्या अंगात संचारला विराट कोहली; चाहत्यांनी दिलं 'Prince Gill' नाव, Video  

Shubman Gill IPL 2022 : गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानला ९ बाद १३० धावांवर रोखले आणि त्यानंतर हार्दिक, मिलर व गिल यांनी १८.१ षटकांत हे लक्ष्य पार केले. गिलने खणखणीत षटकार मारून विजय मिळवून दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:52 AM2022-05-30T10:52:46+5:302022-05-30T10:53:44+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill's Celebration after winning ipl final reminds Fans of Virat Kohli, Cricketer Gets New Name: 'Prince Gill', Watch Video | Shubman Gill IPL 2022 : गुजरातला जेतेपद मिळवून देताच शुबमन गिलच्या अंगात संचारला विराट कोहली; चाहत्यांनी दिलं 'Prince Gill' नाव, Video  

Shubman Gill IPL 2022 : गुजरातला जेतेपद मिळवून देताच शुबमन गिलच्या अंगात संचारला विराट कोहली; चाहत्यांनी दिलं 'Prince Gill' नाव, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill IPL 2022 :  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने रविवारी आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले. हार्दिकने अष्टपैलू कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर डेव्हिड मिलर व शुबमन गिल ( Shubman Gill) यांनी अखेरपर्यंत खिंड लढवून राजस्थान रॉयल्सचा पराभव निश्चित केला. गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानला ९ बाद १३० धावांवर रोखले आणि त्यानंतर हार्दिक, मिलर व गिल यांनी १८.१ षटकांत हे लक्ष्य पार केले. गिलने खणखणीत षटकार मारून विजय मिळवून दिला आणि हेल्मेट काढून सेलिब्रेशन केलं. त्याचं हे सेलिब्रेशन पाहून चाहत्यांना विराट कोहली आठवला अन् त्यांनी गिलला Prince Gill असे टोपणनाव दिले.  


यशस्वी जैस्वाल ( २२), संजू सॅमसन ( १४), देवदत्त पडिक्कल ( २), जोस बटलर  ( ३९), शिमरोन हेटमायर ( ११), आऱ अश्विन ( ६) आणि  ट्रेंट बोल्ट (११) हे RR चे फलंदाज काल अपयशी ठरले. हार्दिक पांड्याने १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. रियान परागने १५ धावा केल्या. साई किशोरने २ षटकांत २० धावांत २, राशिद खानने ४ षटकांत १८ धावांत १, तर शमी ( १-३३) व यश दयाल ( १-१८) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. 

प्रत्युत्तरात वृद्धीमान साहा ( ५) व मॅथ्यू वेड ( ८) लगेच माघारी परतले. शुबमनला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले.  हार्दिक व शुबमनने ५३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून गुजरातसाठी पाया सेट केला. त्यानंतर शुबमन व डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत नाबाद ४७ धावांची भागीदारी करून गुजरातचा ७ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय पक्का केला. गिल ४५ धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने १९ चेंडूंत नाबाद ३२ धावा केल्या. गिलने या स्पर्धेत  १६ सामन्यांत ३४.५० सरासरीने ४८३ धावा केल्या. 


पाहा गिलचे सेलिब्रेशन 

 

Web Title: Shubman Gill's Celebration after winning ipl final reminds Fans of Virat Kohli, Cricketer Gets New Name: 'Prince Gill', Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.