Join us

शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...

Shubman Gill watch price: शुभमन गिल त्याच्या फोटोतील घड्याळ्यामुळे अधिक चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:18 IST

Open in App

Shubman Gill watch price : भारतीय संघ सध्या दुबई येथे सुरू असलेल्या आशिया कपमध्ये खेळत आहे. पहिला सामना भारताने सहज जिंकला. आता यूएईविरुद्ध शानदार विजयानंतर, भारताचा दुसरा सामना रविवारी १४ सप्टेंबरला होणाऱ्या पाकिस्तानशी होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू आनंदी मूडमध्ये दिसत आहेत. यादरम्यान टीमचा उपकर्णधार शुभमन गिल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे, तो फोटोतील घड्याळ्यामुळे अधिक चर्चेत आला आहे.

शुभमन गिलच्या घड्याळाची किंमत किती?

नुकताच शुभमन गिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये सर्वांचे लक्ष त्याच्या मनगटावर बांधलेल्या महागड्या घड्याळाकडे वेधले गेले आहे. शुभमनने रोलेक्स ऑयस्टर यलो गोल्ड आणि डायमंड घड्याळ घातले आहे. या घड्याळाच्या किंमतीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कारण या घड्याळाची किंमत सुमारे ९० लाख ते १ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय क्रिकेटपटूंना महागड्या घड्याळांची आवड

क्रिकेट जगतात खेळाडूंना महागड्या वस्तूंची आवड असणे हे काही नवीन नाही. टीम इंडियाचे अनेक खेळाडू अनेकदा महागड्या घड्याळे आणि लक्झरी वस्तूंसह दिसतात. यात हार्दिक पांड्याचे नाव आघाडीवर आहे. अनेक वेळा त्याच्या हातावर दोन ते अडीच कोटी रुपयांचे महागडे घड्याळ दिसले आहे. आता याच यादीत शुभमन गिलचे नावही सामिल झाले आहे.

 

टॅग्स :शुभमन गिलआशिया कप २०२५भारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्या