ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युवा खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून टीम इंडियाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. पहिल्या कसोटीत अवघ्या ३६ धावांवर गडगडणाऱ्या टीम इंडियावर प्रचंड टीका झाली. त्यात विराट कोहली मायदेशी परतला अन् खडतर प्रसंगी अजिंक्य रहाणेनं संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतली. अशातही टीम इंडियानं दुसरी कसोटी जिंकून मालिका १-१ बरोबरीत आणली. त्यानंतर उर्वरित दोन कसोटींमध्ये दमदार कामगिरी करताना मालिका २-१ अशी जिंकून इतिहास घडवला. या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा युवा खेळाडूंना महिंद्रा थार ( Mahindra Thar) गिफ्ट देण्याची घोषणा महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी केली होती. 'ही कसली खिलाडूवृत्ती?'; ड्वेन ब्रोव्होच्या कृतीनं क्रिकेटवर्तुळात संपात, फ्रँचायझी बैठकीत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी
शुबमन गिलच्या घरी मंगळवारी महिंद्रा थार गाडी पोहोचली. शुबमन गिलनं ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्यानं लिहिलं की,''महिंद्रा थार मिळवण्याचा आनंद शानदार आहे. आनंद महिंद्रा सर मी तुमचा आभारी आहे आणि या गिफ्टसाठी खुप खुप आभारी आहे. भारतासाठी खेळणे हा माझा सन्मान समजतो आणि देशासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे.''