Join us  

ICC Award 2023 : वन डे तील सर्वोत्तम खेळाडूसाठी ३ भारतीयांमध्ये टक्कर, न्यूझीलंडचा खेळाडूही शर्यतीत

ICC Men’s ODI Cricketer of the Year 2023  - भारतामध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या चार खेळाडूंना ICC पुरूष वन डे क्रिकेटपटू ऑफ द इयर २०२३ पुरस्कारासाठी निवडण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 3:56 PM

Open in App

ICC Men’s ODI Cricketer of the Year 2023 (Marathi News) : भारतामध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या चार खेळाडूंना ICC पुरूष वन डे क्रिकेटपटू ऑफ द इयर २०२३ पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. या चार खेळाडूंमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे आणि एक खेळाडू न्यूझीलंडचा आहे. 

शुबमन गिल (भारत)ने २०२३ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये २९ सामन्यांत १५८४ धावा केल्या आहेत आणि २४ झेल टिपले आहेत.  गिलने ६३.३६ च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये एका वर्षात भारतीयाने केलेल्या धावांमध्ये गिलचा पाचवा क्रमांक होता. केवळ सचिन तेंडुलकर (1996, 1998), राहुल द्रविड (1999) आणि सौरव गांगुली (1999) यांनी कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा केल्या आहेत. गिलने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ४४.२५ च्या सरासरीने ३५४ धावा केल्या. दुर्दैवाने, डेंग्यू तापाने ग्रासल्यामुळे सलामीवीर भारतासाठी वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्याला मुकला. वर्षाच्या सुरुवातीला हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध २०८ धावांची शानदार खेळी करून गिल द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज बनला.  गिल वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा संयुक्त-दुसरा फलंदाज ठरला.  

मोहम्मद शमी (भारत)ने भारतासाठी वर्ल्ड कप गाजवला. त्याने २०२३ मध्ये १९ सामन्यात ४३ विकेट्स घेतल्या आणि ३६ धावा व ३ झेल घेतले.  मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये १०.७ च्या आश्चर्यकारक सरासरीने २४ विकेट्स घेतल्या.  शमीने स्पर्धेत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये तीन पाच बळी आणि चार बळी घेतले. या वेगवान गोलंदाजाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताकडून सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नावावर केला. त्याने १८ सामन्यांत ५५ बळी घेतले. केवळ सात गोलंदाजांनी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ५० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.

विराट कोहली (भारत)ने २०२३ मधअये २७ सामन्यात १३७७ धावा केल्या. त्याच्या नावावर १ बळी व १२ झेल आहेत. कोहलीने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली.  भारताच्या तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूने वर्ल्ड कप  स्पर्धेतील त्याच्या ११ डावांपैकी नऊ डावांमध्ये अर्धशतक ठोकली. त्याने ७६५ धावा करून वन डे वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला. त्याने सचिन तेंडुलकरचा २००३ सालचा विक्रम मोडला. या पुरस्काराच्या शर्यतीत न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल हाही आहे. त्याने २६ सामन्यात १२०४ धावा केल्या आहेत. शिवाय ९ विकेट्स आणि २२ झेलही त्याच्या नावावर आहेत. 

 

टॅग्स :आयसीसीविराट कोहलीमोहम्मद शामीशुभमन गिल