Shubman Gill: शुभमन गिलचा अनोखा पराक्रम, आता फक्त विराट कोहलीच त्याच्या पुढे!

Shubman Gill Create History: आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल उत्तम फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:32 IST2025-05-07T15:29:16+5:302025-05-07T15:32:44+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill Create History Against Mumbai Indians Match, Breaks Shreyas Iyer Record, Only Virat Kohli On Top | Shubman Gill: शुभमन गिलचा अनोखा पराक्रम, आता फक्त विराट कोहलीच त्याच्या पुढे!

Shubman Gill: शुभमन गिलचा अनोखा पराक्रम, आता फक्त विराट कोहलीच त्याच्या पुढे!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल उत्तम फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात शुभमन गिलने ५०० धावांचा टप्पा ओलांडला. या कामगिरीसह त्याने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरचा विक्रम मोडीत काढला. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या युवा कर्णधारांच्या यादीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर पोहोचला. या यादीत आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.

कर्णधार म्हणून आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली हा सर्वात तरुण फलंदाज आहे. विराटने २०१३ मध्ये पहिल्यांदाच आरसीबीचा कर्णधार बनला. तेव्हा त्याने त्याच्या संघासाठी ६३४ धावा केल्या. त्यावेळी विराट कोहलीचे वय २४ वर्षे १६८ दिवस होते. यावर्षी शुभमन गिलने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये ५०० धावांचा टप्पाही ओलांडला. शुभमन गिलचे वय २५ वर्षे २४० दिवस आहे. 

श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला
२०२० च्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना श्रेयस अय्यरने ५१९ धावा केल्या. श्रेयसने ५०० धावा पूर्ण केल्या, तेव्हा तो २५ वर्षे ३४१ दिवसांचा होता. या यादीत शुभमन गिल आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, त्याने श्रेयस अय्यरला मागे टाकले आहे. २०१५ मध्ये विराट कोहली आरसीबीचा कर्णधार होता, तेव्हा त्याने कर्णधारपद सांभाळताना २६ वर्षे १९९ दिवसांत ५०० धावा पूर्ण केल्या. म्हणजेच कोहली पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे आणि श्रेयस अय्यर तिसऱ्या स्थानावर आहे.

शुभमन गिलचा दमदार फॉर्म
शुभमन गिलने नुकतेच ५०० धावा केल्या आहेत. तो यावेळी सर्वाधिक धावाही करू शकतो. याचा अर्थ त्याला ऑरेंज कॅप जिंकण्याची संधी आहे. हे काम इतके सोपे नाही. त्याची सूर्यकुमार यादव, साई सुदर्शन आणि विराट कोहली यांच्याशी स्पर्धा आहे. पण कर्णधार म्हणून तो या वर्षीच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करेल हे जवळपास निश्चित आहे.

Web Title: Shubman Gill Create History Against Mumbai Indians Match, Breaks Shreyas Iyer Record, Only Virat Kohli On Top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.