भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियानं २ विकेट्सच्या मोबदल्यात ३१८ धावा करत अपेक्षेप्रमाणे पहिला दिवस गाजवला. पहिल्या चेंडूपर्यंत अगदी पहिल्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत सगळं काही भारतीय संघाच्या बाजूनं घडलं. पहिल्या दिवशी ४-५ षटकांचा खेळ बाकी असताना भारतीय कर्णधार शुबमन गिल आणि वेस्ट इंडिजचा विकेटिपर टेविन इमलॅच एकमेकांना जोरात धडकले. दोघांच्यात झालेली टक्कर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमसह सामना पाहणाऱ्या टीम इंडियाच्या चाहत्यांची धकधक वाढवणारी होती. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खणखणीत चौकारासह खाते उघडलं अन् मग संयमी खेळीसह पुढे नेली इनिंग
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ६९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर साई सुदर्शन बाद झाल्यावर शुबमन गिल मैदानात आला. चार निर्धाव चेंडू खेळल्यावर गिलनं पाचव्या चेंडूवर खणखणीत चौकार मारत खाते उघडले. ५० हून अधिक चेंडू खेळत १५ धावा करून गिलनं संयमी खेळीचा नजराणा पेश केला. दरम्यान ८५ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक धावा घेताना तो थेट विकेट किपरला जाऊन धडकल्याचे पाहायला मिळाले.
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
दोघांची जोरदार धडक, मेडिकल टीमनं मैदानात घेतली धाव
अँडरसन फिलिप घेऊन आलेल्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या यशस्वी जैस्वालनं मिडविकेटच्या दिशेला फटका मारत एक धाव घेतली. धाव पूर्ण करताना गिल थेट चेंडूवर नजर ठेवून असलेल्या विकेट किपरला धडकला. दोघेरी वेदनेनं व्याकूळ झाल्याचे दिसले. दोन्ही संघाचे फिजिओ मैदानात आले. धडक जोरदार झाली. सुदैवानं कुणाला गंभीर इजा झाली नाही, पण मैदानातील ही घटना, थोड्या वेळासाठीच का होईना, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमसह चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवून गेली.