Join us

कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री

शुबमन गिलची कमाल; कॅप्टन्सीत ठोकलं सलग दुसरे शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 23:02 IST

Open in App

Shubman Gill Set New Record With Back To Back Century : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात  शुभमन गिलनं शतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना सलग दुसऱ्या सामन्यात त्याच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय कॅप्टन ठरलाय. याआधी  विजय हजारे, सुनील गावसकर आणि विराट कोहली यांनी हा पराक्रम करून दाखवला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गिलच्या भात्यातूनं आले कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक

इंग्लंड दौऱ्यातील लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानातून शुबमन गिलनं  कसोटी संघाच्या नेतृत्वासह आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शुबमन गिलनं १४७ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जो रुटच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार मारत भारतीय कसोटी संघाच्या नव्या कर्णधारानं १९९ चेंडूत ११ चौकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे सातवे शतक आहे.

खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतक झळकवणारे भारतीय कर्णधार१९५१ मध्ये  विजय हजारे यांनी इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद १६४ धावांची खेळी केली होती. याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्यांच्या भात्यातून पहिल्या डावात १५५ धावांची खेळी पाहायला मिळाली होती.  लिटल मास्टर सुनील गावसर यांनी १९७६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ११६ धावांची खेळी केली होती. १९७८ मध्ये कॅप्टन्सीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात २०५ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. विराट कोहलीनं २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना पहिल्या कसोटी सामन्यात ११५ आणि १४१ धावा आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात १४७ धावांची खेळी केली होती. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिल