Shreyas Iyer Injury Update Recovery Fast But Doubtful IND vs SA ODI Series : भारत–दक्षिण आफ्रिका मालिकेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन कसोटी सामन्यांनंतर दोन्ही संघात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी संघाच्या घोषणेनंतर आता वनडे संघात कोणाला संधी मिळणार, यावर चर्चा सुरु आहे. त्यात आता श्रेयस अय्यर आगामी वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
त्याची तब्येतीत सुधारणा होत आहे, पण...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत अय्यरकडे उपकर्णधाराची जबाबदारी होती. मात्र दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला. पुनर्वसन सुरु असले तरी त्याला खेळवण्याबाबत बीसीसीआय कोणतीही घाई करणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
श्रेयस अय्यर किती दिवस संघाबाहेर राहणार?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या मेडिकल टीमने निवडकर्त्यांना अय्यरच्या प्रकृतीविषयी सविस्तर रिपोर्ट दिला आहे. त्यात अय्यरला मैदानात परतण्यासाठी अजून सुमारे महिन्याभराचा कालावधी लागेल, असे नमूद केले आहे. BCCI सूत्रांच्या हवाला देत वृत्तात पुढे म्हटले आहे की, अय्यरबाबत बोर्ड (BCCI) कोणताही धोका पत्करणार नाही. त्याची ऑक्सिजन पातळी काही दिवसांपूर्वी ५० पर्यंत खाली आली होती आणि त्याला उभे राहायलाही त्रास होत होता. त्यामुळे पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत त्याला आणखी वेळ देणे योग्य ठरेल.
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी नवा उपकर्णधार कोण?
अय्यर हा सध्या भारताच्या वनडे संघातील महत्त्वाचा खेळाडू असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्याकडे उपकर्णधारपद होते. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेला तो मुकण्याची भीती असल्याने टीम इंडियाला तात्पुरता नवा उपकर्णधार नियुक्त करावा लागू शकतो. रिषभ पंत या मालिकेतून भारतीय वनडे संघात पुनरागमन करताना दिसू शकतो. तो कसोटी संघाचा उप कर्णधार असून श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत वनडेतही तो ही जबाबदारी पार पाडताना दिसणार का? ते पाहण्याजोगे असेल.
कधी पासून रंगणार आहे वनडेचा थरार?
दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी मालिकेनं भारत दौऱ्याची सुरुवात करेल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर ३० नोव्हेंबरला दोन्ही संघ रांचीच्या मैदानातून वनडे मालिकेला सुरुवात करतील. रायपूरच्या मैदानात दुसरा तर विशाखापट्टणमच्या मैदानात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे.