IPL 2025 Punjab Kings Reply On Digvesh Rathi's Fiery Send Off To Priyansh Arya : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १३ व्या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या संघाने अगदी आरामात विजय मिळवला. सलग दुसऱ्या विजयानंतर पंजाबच्या संघाने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून खास पोस्ट शेअर लखनौच्या संघाला ट्रोल केले आहे. धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला पहिला धक्का दिल्यावर दिग्वेश राठीनं सलामीवीर प्रियांश आर्य याच्यासमोर नोट रायटिंग सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
LSG च्या ताफ्यातील भिडूच्या अनोख्या सेलिब्रेशनला PBKS नं दिला कडक रिप्लाय
'नवाबां'समोर 'पंजाबी' रुबाब दाखवून दिल्यावर पंजाब किंग्जच्या संघानं मैदानात घडलेल्या अनोख्या सेलिब्रेशनला कडक रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. पंजाब फ्रँचायझीनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये प्रियांशच्या आर्य आउट झाल्यावर त्याच्यमोसर नोट रायटिंग सेलिब्रेशन करणारा दिग्वेश याचा फोटो शेअर करताना त्याला एक नोट जोडली आहे. पंजाब किंग्जने ८ विकेट्सनी हा सामना जिंकलाय, असा उल्लेख करत एका अर्थाने आपल्या भिडूला नडलेल्या गोष्टीवरून PBKS संघानं प्रतिस्पर्धी LSG संघाला ट्रोल केल्याचे दिसते.
IPL 2025 LSG vs PBKS :IPL मुळं जोडी फुटली; हिशोब लिहून ठेवलेल्या सेलिब्रेशनमध्ये 'दुश्मनी' दिसली
पंजाबी चाहत्यांनी घेतली पंगा घेणाऱ्या दिग्वेशची फिरकी
पंजाबच्या संघाने धावांचा पाठलाग करताना ज्या दोन विकेट गमावल्या त्या दोन्ही विकेट लखनौच्या संघातील लेग स्पिनर दिग्वेश राठी यानेच घेतल्या. पण प्रियांश आर्य याच्या रुपात त्याने पहिली विकेट घेतली. त्यानंतर प्रभसिमरनची विकेटही त्याच्याच खात्यात जमा झाली. पहिली विकेट मिळाल्यावर त्याने जे कृत्य केले ते अनेकांना खटकले आहे. सोशल मीडियावर अनेकजण युवा फिरकीपटूलाही ट्रोल करत आहेत. लखनौच्या मैदानात पंजाबच्या संघाला प्रोत्साहन करायला स्टेडियमवर आलेल्या चाहत्यांनही मॅच जिंकल्यावर या युवा फिरकीपटूची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. पंजाबी चाहत्यांनी जशास तसे उत्तर देण्यासाठी त्याचीच नक्कल केल्याचेही दिसून आले.