Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shreyas Iyer Injury, IPL 2026: श्रेयस अय्यर पुढच्या सामन्याला मुकणार? हाताच्या दुखापतीवर आली मोठी अपडेट

Shreyas Iyer Injury, IPL 2026: फलंदाजाने मारलेला फटका नॉन स्ट्राईकवर अय्यरला लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:53 IST

Open in App

Shreyas Iyer Injury: गेल्या वर्षी पंजाब किंग्स संघाने दमदार खेळ दाखवला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने अप्रतिम कामगिरी केली होती. या हंगामात त्याच्या संघाने ठिकठाक सुरुवात केली. पण श्रेयस अय्यरला मात्र पहिल्याच सामन्यात दुखापतीचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. तशातच आता अय्यरच्या दुखापतीबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. खुद्द अय्यरनेच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सामन्यानंतर जेव्हा त्याला पहिला प्रश्न त्याच्या हाताच्या दुखापतीबद्दल विचारण्यात आला, तेव्हा श्रेयस अय्यरने यावर प्रतिक्रिया दिली.

दुखापत किती गंभीर?

पंजाब किंग्सच्या डावादरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली. पंजाबच्या डावाच्या १२व्या षटकात, गुजरातचा फिरकी गोलंदाज रशीद खानचा पाचवा चेंडू कूपर कॉनोलीने टाकला. त्या फटक्याचा वेग इतका होता की, नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरला सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि चेंडू थेट त्याच्या डाव्या हातावर आदळला. चेंडू लागल्यानंतर अय्यर वेदनेने कळवळला. त्यामुळे वैद्यकीय पथकाने मैदानावरच त्याची तपासणी केली. मॅजिक स्प्रे लावल्यानंतर तो पुन्हा खेळू शकला. पण हाताच्या दुखापतीच्या तीव्रतेबद्दल अनेकांना प्रश्नचिन्ह होते. त्यावर अय्यरनेच उत्तर दिले.

श्रेयस अय्यर पुढील सामन्याला मुकणार?

सर्वप्रथम, श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती सांगितली. बोटाच्या दुखापतीबद्दल, श्रेयस अय्यर सामन्यानंतर म्हणाला की त्याला बरे वाटत आहे. काहीही झालेले नाही. सर्व काही पूर्ववत झाले आहे. उगाच वेगळे काहीतरी सांगून मला अशुभ संकेत द्यायचे नाहीत. मला सकारात्मक राहायचे आहे आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Shreyas Iyer's injury update: Will he miss the next IPL match?

Web Summary : Punjab Kings captain Shreyas Iyer sustained a hand injury during the match against Gujarat Titans. Iyer himself clarified that he is feeling better and hopes to be fit for the next game. He wants to remain positive about his recovery.
टॅग्स :आयपीएल २०२६श्रेयस अय्यरपंजाब किंग्स