श्रेयस अय्यरला १२ लाखांचा मोठा दणका! IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यानंतर BCCIची कारवाई

Shreyas Iyer Fined: पंजाबच्या संघाने विजय मिळवला तरीही अय्यरला धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:43 IST2026-04-01T15:40:22+5:302026-04-01T15:43:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shreyas Iyer becomes the first offender of IPL 2026, BCCI rolls out heavy punishment for Punjab Kings captain | श्रेयस अय्यरला १२ लाखांचा मोठा दणका! IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यानंतर BCCIची कारवाई

श्रेयस अय्यरला १२ लाखांचा मोठा दणका! IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यानंतर BCCIची कारवाई

Shreyas Iyer Fined: पंजाब किंग्स संघाने आयपीएल २०२६ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. पण या धमाकेदार विजयानंतरही श्रेयस अय्यरला मोठा धक्का बसला. कर्णधार श्रेयस अय्यरसाठी एक चिंता वाढवणारी बातमी सामना संपल्यानंतर समोर आली. हंगामाच्या पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. श्रेयस अय्यरचे नेमके काय चुकले, जाणून घेऊया.

श्रेयस अय्यरवर कारवाई

३१ मार्च रोजी न्यू चंदीगड येथील मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध सामना झाला. श्रेयस अय्यरने या सामन्यात ११ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १८ धावा केल्या. या सामन्यात पंजाब किंग्सने गोलंदाजी करताना निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला. आयपीएलच्या आचारसंहितेतील 'स्लो ओव्हर रेट' संबंधित कलम २.२२ नुसार हा गुन्हा मानला जातो. पंजाबचा या हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.

मोठ्या कारवाईची टांगती तलवार

जर पंजाब किंग्ज संघाकडून पुन्हा ही चूक झाली, तर श्रेयस अय्यरला २४ लाखांचा दंड केला जाईल. तसेच दुसऱ्यांदा गुन्हा घडल्याने पंजाब संघातील इतर खेळाडूंनाही दंड भरावा लागेल. याशिवाय, तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदीदेखील घातली जाऊ शकते.

गुजरात टायटन्सने दिलेले १६३ धावांचे आव्हान पंजाबने ३ गडी राखून पूर्ण केले. पंजाबचा युवा खेळाडू कूपर कॉनोली (Cooper Connolly) याने ४४ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.

श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया

विजयानंतर श्रेयस म्हणाला, "आयपीएलमध्ये असे चढ-उतार येत असतात, पण संघाने संयम राखला. कूपरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती खरोखरच अप्रतिम होती." विजयी सुरुवात झाली असली, तरी १२ लाखांच्या दंडामुळे श्रेयस आणि पंजाब किंग्सला पुढील सामन्यांमध्ये वेळेचे नियोजन अधिक चोख ठेवावे लागणार आहे. पंजाबचा पुढचा सामना ३ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे.

Web Title : श्रेयस अय्यर पर आईपीएल 2026 मैच के बाद ₹12 लाख का जुर्माना

Web Summary : गुजरात टाइटन्स के खिलाफ पंजाब किंग्स की जीत के बाद श्रेयस अय्यर पर धीमी ओवर गति के लिए आईपीएल 2026 में ₹12 लाख का जुर्माना लगाया गया। दूसरी बार ऐसा होने पर भारी जुर्माना लग सकता है। कूपर कॉनोली के नाबाद 72 रनों ने जीत सुनिश्चित की।

Web Title : Shreyas Iyer fined ₹12 lakh after IPL 2026 match.

Web Summary : Shreyas Iyer faced a ₹12 lakh fine for slow over-rate in IPL 2026 after Punjab Kings' win against Gujarat Titans. A second offense could mean heavier penalties. Cooper Connolly's unbeaten 72 secured the victory.