Join us  

कर्णधार, प्रशिक्षकाची संघ निवडीत थेट भूमिका असायला हवी?

संघ निवडीत कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या भूमिकांचे वेगवेगळ्या देशात विविध निकष आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डात कर्णधार हा निवड प्रक्रियेचा भाग असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 7:08 AM

Open in App
ठळक मुद्देसंघ निवडीत कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या भूमिकांचे वेगवेगळ्या देशात विविध निकष आहेत.ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डात कर्णधार हा निवड प्रक्रियेचा भाग असतो.

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

संघ निवडीत कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या भूमिकांचे वेगवेगळ्या देशात विविध निकष आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डात कर्णधार हा निवड प्रक्रियेचा भाग असतो. दुसरीकडे मिस्बाहला प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ते बनवून पाकिस्तानने नवी परंपरा सुरू केली.भारतासारख्या देशात कर्णधार आणि कोच हे संघ निवडीत काही प्रस्ताव देऊ शकतात. अशावेळी कोणती पद्धत चांगली हे ठरविणे कठीण आहे.

निवड प्रक्रियेत प्रशिक्षक आणि कर्णधार यांचा थेट सहभाग नसल्याने अनेकदा वाद निर्माण होतो. उदाहरण द्यायचे तर १९८९ ला मोहिंदर अमरनाथ यांची संघाला गरज होती मात्र त्यांनी  निवड समितीला ‘मूर्खांचा समूह’ असे संबोधताच निवडकर्ते त्यांना संघात स्थान देण्याच्या बाजूने नव्हते. निवडीत केवळ संबंध चांगले असतील तर काम होईल,असे होऊ नये. त्या खेळाडूची संघाला किती उपयुक्तता आहे याचाही विचार व्हायला हवा.

अनेकदा अनपेक्षित घटनांमुळे व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यात बिनसल्याच्या घटना घडतात. असाच प्रकार सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला संघ आणि निवडतरकर्ते यांच्यात घडलेला दिसतो. न्यूझीलंडविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनलनंतर शुभमन गिल जखमी झाला. यामुळे देवदत्त पडिक्कल आणि पृथ्वी शॉ यांना इंग्लंडमध्ये पाठवावे, अशी व्यवस्थापनाने विनंती केली. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने ही मागणी मात्र फेटाळली. संघ व्यवस्थापनाची अस्वस्थता समजू शकतो पण कोरोनाच्या स्थितीत पर्याय शोधणे कठीण होऊन बसते. इंग्लंडमध्ये खेळाडू पाठविल्यानंतरही त्यांना काही दिवस क्वारंटाईन व्हावे लागते.

तथापि, या प्रकरणी निवडकर्त्यांची भूमिका योग्य होतीे, असे माझे मत आहे. कोरोना काळात संघ व्यवस्थापनाला स्वत:ला सुरक्षित करायचे असेलही मात्र यासाठी संपूर्ण निवड समितीला वेठीस धरणे योग्य नाही. कोरोनाचे भय लक्षात घेता भारतीय संघाने आधीच रोहितसह मयंक अग्रवाल, लोकेश राहुल आणि अभिमन्यू ईश्वर या तीन सलामीवीरांना इंग्लंडला नेले. संघ निवडीच्या वेळीच चार सलामीवीर होते. ते अद्याप कायम आहेत. अधिक खेळाडू जोडल्यास सलामीवीरांची संख्या अधिक होईल. शिवाय संघ निवडताना अनावश्यक दडपण वाढेल. शॉ आणि पडिक्कल उत्तम पर्याय असतील. ते सुरुवातीपासून संघात का नव्हते, हा निवडकर्त्यांना मूर्ख ठरविणारा प्रश्न देखील उपस्थित होईल.

  • दुखापती, आजारपण आणि इतर कारणांमुळे खेळाडूंना काही काळ दूर रहावे लागते. खेळाचा तो अविभाज्य भाग आहे. संघ आणि खेळाडूंनी या गोष्टीची सवय करायला हवी. अशा परिस्थितीमुळे संघातील इतर खेळाडूंना त्यांच्यातील कौशल्य दाखवून देण्याची संधी चालून येते. ऑस्ट्रेलियातील दौऱ्यात ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज हे असेच ‘मॅचविनर’ म्हणून जगापुढे आले.
  • इंग्लंड दौऱ्यात देखील मयंक आणि राहुल यांना कसोटीत प्रस्थापित होण्याची ही मोठी संधी असेल. अभिमन्यू हा देखील कसोटीत उत्कृष्ट सुरुवात करू शकेल.
  • अग्रवाल आणि राहुल यांच्या कसोटी कारकिर्दीत पुनरुज्जीवन करण्याची किंवा अभिमन्यूने आपल्या कारकीर्दीची सुरुवात प्रभावाने करण्याची ही एक अनपेक्षित परंतु शानदार संधी आहे. तेव्हा संध व्यवस्थापनाने सावल्यांचा पाठलाग करण्याऐवजी उपलब्ध असलेल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवायला हवा.
टॅग्स :रवी शास्त्रीविराट कोहलीआॅस्ट्रेलियाइंग्लंडभारत